एक्स्प्लोर

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती, 250 पदांवर भरती; अर्ज दाखल करण्यासाठी उरले अवघे काही दिवस

Bank Of Baroda Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदा भरतीअंतर्गत 250 पदांवर भरती केली जाणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

Job Vacancy : बँकेत नोकरीच्या (Bank Job) संधीची वाट पाहत असाल, तर ही संधी सोडू नका. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) मध्ये नोकरभरती केली जात आहे. बँकेने वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) नवीन भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. 

BOB Recruitment 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) ची भरती प्रक्रिया सुरु झाली असून या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लगेच अर्ज दाखल करा. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ व्यवस्थापकाची एकूण 250 पदे भरली जाणार आहेत. 

Bank Of Baroda Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 6 डिसेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

Bank Of Baroda Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून 60 टक्के गुणांसह बॅचलर पदवी. यासोबत रिलेशनशिप किंवा क्रेडिट मॅनेजमेंटचा आठ वर्षांचा अनुभव असावा.

Bank Of Baroda Recruitment 2023 : वयोमर्यादा

वयाबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवाराचे किमान वय 1 डिसेंबर 2023 रोजी 28 वर्षे आणि कमाल वय 37 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट मिळेल.

Bank Of Baroda Recruitment 2023 : अर्ज फी

सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह 600 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कर आणि पेमेंट गेटवे शुल्कासह 100 रुपये भरावे लागतील. अर्जाची फी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.

Bank Of Baroda Recruitment 2023 : निवड प्रक्रिया

BOB पात्र उमेदवारांची ऑनलाइन चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीद्वारे भरती करेल. ऑनलाइन चाचणी इत्यादींची माहिती बँकेकडून वेळेत दिली जाईल.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
MPSC परीक्षेत अंतिम निवड न झालेल्या उमेदवारांसाठी 'गुडन्यूज'; सरकारचा मोठा निर्णय, 'निपुण सेतू' उपक्रम
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
तरुणांना देशसेवा करण्याची मोठी संधी! अर्ज करण्यास उरला फक्त एक दिवस, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Oracle Layoff : आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त
आयटी क्षेत्रात पुन्हा मोठी खळबळ! जगप्रसिद्ध कंपनीकडून एकाचवेळी तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना नारळ, 12 हजार भारतीयांचा संसार उद्ध्वस्त?
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
महाराष्ट्रात शासकीय नोकरीची मोठी संधी, 571 पदांसाठी मोठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget