एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
हैदराबादची कोलकातावर मात, आयपीएलमधील आव्हान कायम
नवी दिल्ली : डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सला हरवून आयपीएलमधलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. या विजयामुळे हैदराबादला दुसऱ्या पात्रता सामन्यात खेळण्याची संधी मिळाली असून शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या लढतीत हैदराबादसमोर गुजरात लायन्सचं आव्हान असेल. हैदराबाद आणि गुजरातमधल्या लढाईचा विजेता आयपीएलच्या फायनलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा मुकाबला करेल.
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या लढतीत हैदराबादने कोलकात्यावर 22 धावांनी मात केली. या सामन्यात हैदराबादने कोलकात्याला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. पण कोलकात्याला ते पेलवलं नाही. 20 षटकांत आठ बाद 140 धावांच करता आल्या.
हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने तीन आणि मोझेस हेन्रिक्सने दोन विकेट्स काढून आपल्या टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी हेन्रिक्सने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना 31 धावांची खेळी केली होती. तर युवराज सिंहने 30 चेंडूंत 44 धावा फटकावल्या होत्या. त्यामुळेच हैदराबादला 20 षटकांत आठ बाद 162 धावांची मजल मारता आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement