एक्स्प्लोर
केकेआरच्या पठाणची तुफानी खेळी आणि बंगलोरचा पालापाचोळा
![केकेआरच्या पठाणची तुफानी खेळी आणि बंगलोरचा पालापाचोळा Ipl 2016 Kkr Beats Rcb By 5 Wickets केकेआरच्या पठाणची तुफानी खेळी आणि बंगलोरचा पालापाचोळा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/03083322/Yusuf_Pathan-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : युसूफ पठाण आणि आंद्रे रसेलच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सन रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचा पाच विकेट्सनी धुव्वा उडवला आणि आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. यंदाच्या मोसमात कोलकात्याचा हा आठ सामन्यांमधला पाचवा विजय ठरला आहे. तर बंगलोरचा हा सात सामन्यांमधला पाचवा पराभव आहे.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या लढतीत बंगलोरने कोलकात्याला विजयासाठी 186 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना कोलकात्याची अवस्था 4 बाद 69 अशी झाली होती. पण युसूफ पठाण आणि आंद्रे रसेलने पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी रचून, कोलकात्याला विजयपथावर नेलं.
युसूफनं 29 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 60 धावांची खेळी केली. तर आंद्रे रसेलने 24 चेंडूंमध्ये 39 धावा फटकावल्या. त्याआधी गौतम गंभीरनेही 37 धावांची खेळी करुन कोलकात्याच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं.
त्याआधी विराट कोहली आणि केएल राहुलच्या 84 धावांच्या भागीदारीच्या जोरावर बंगोलरने 20 षटकांत सात बाद 185 धावांची मजल मारली होती. पण एवढी मोठी धावसंख्या उभारूनही बंगलोरला पराभव टाळता आला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)