एक्स्प्लोर

LIVE : ममता बॅनर्जींंचं धरणं आंदोलन अखेर मागे

LIVE

LIVE : ममता बॅनर्जींंचं धरणं आंदोलन अखेर मागे

Background

कोलकाता : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच पश्चिम बंगाल राजकारणाचा आखाडा बनलं आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं धरणं आज तिसऱ्या दिवशीही सुरु आहे. यासोबतच सीबीआयच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी होणार आहे. ममता सरकार विरुद्ध सीबीआय प्रकरणाची सुनावणी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती गुप्ता यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.

काय आहे प्रकरण?
शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं 40 अधिकाऱ्यांचं एक पथक कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी रविवारी त्यांच्या घरी पोहोचलं होतं. पण या पथकाला राजीव कुमार यांची भेट घेण्यास परवानगी दिली नाही. इतकंच नाही तर त्यांना जीपमध्ये भरुन पोलिस स्टेशनमध्ये नेलं. या पथकाला पोलिस कोठडीतही ठेवलं होतं.

पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरुन सीबीआयने ही कारवाई केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी आपल्याला त्रास देत असून अजित दोभाल यांच्या इशाऱ्यावर ही कारवाई सुरु असल्याचंही ममतांनी म्हटलं आहे. वॉरंटविना पोलिस आयुक्तांच्या घरी छापा टाकण्याची सीबीआयची हिंमतच कशी झाली? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी रविवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून धरणं आंदोलन करत आहे.

राजकीय तमाशात सीबीआय नावाच्या पोपटाची पिसं का निघतात?

पुरावे सादर करा, कारवाई करु : सुप्रीम कोर्ट
शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार पुरावे नष्ट करत असल्याचा दावा सीबीआयने कोर्टात केला. त्याविषयी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, "पुरावे इलेक्ट्रॉनिक आहेत. पुरावे नष्ट केले तर ती पुन्हा शोधले जाऊ शकतात. तुम्ही हे पुरावे नष्ट केले जात आहेत, याबाबत पुरावे सादर करा. तसेच याविरोधात कठोर कारवाईही केली जाईल."

शारदा चिटफंड घोटाळा
शारदा चिटफंड घोटाळा जवळपास 3 हजार कोटी, तर रोझ व्हॅली घोटाळा अंदाजे 15 हजार कोटींचा असल्याचा आरोप आहे. एप्रिल 2013 मध्ये शारदा घोटाळा समोर आला होता. शारदा ग्रुपच्या कंपन्यांनी चुकीच्या पद्धतीने गुंतवणूकदारांकडून पैसे जमा केले होते आणि ते परत केलेच नाहीत. गुंतवणूकदारांनी पैशाची मागणी सुरु केल्यानंतर हा घोटाळा उघड झाला.

घोटाळा उघड झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारवरही प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलं होतं. शारदा ग्रुपने जवळपास 10 लाख गुंतवणूकदारांना फसवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवण्यात आलं.

संबंधित बातम्या

ममता सरकार वि. सीबीआय : दिल्लीत शरद पवारांच्या घरी विरोधक एकवटले

LIVE : ममता सरकार विरुद्ध सीबीआय वाद

ममता सरकार वि. सीबीआय : सीबीआयच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

18:38 PM (IST)  •  05 Feb 2019

ममता बॅनर्जींंचं सीबीआय कारवाई विरोधातील तीन दिवसीय धरणं आंदोलन अखेर मागे
13:40 PM (IST)  •  05 Feb 2019

लड़ाई लड़ाई लड़ाई चाई... लड़ाई कोरे बाँचते चाई.. (लढाई करायचीय...लढाई करुन विजय मिळवायचाय...) सीबीआय विरुद्ध ममता या वादावर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनंतर या घोषणांनी धरणं आंदोलनस्थळ दुमदुमून गेलं
11:43 AM (IST)  •  05 Feb 2019

11:39 AM (IST)  •  05 Feb 2019

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ममतांची प्रतिक्रिया : दुसरीकडे हा आमचा नैतिक विजय असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर दिली. "राजीव कुमार यांच्यावर जबरदस्तीने कारवाई होणार नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश हा बंगालच्या जनतेचा, देशातील जनतेचा आणि मीडियाचा विजय आहे. केंद्र सरकार संविधानाचं उल्लंघन करत आहे, आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार. कोणीही या देशाचा बिग बॉस असू शकत नाही. लोकशाहीच बिग बॉस आहे. केंद्र सरकारवर टीका केली तर आमचा विरोध होता," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.
10:59 AM (IST)  •  05 Feb 2019

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
Embed widget