Fact Check : काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सोशल मीडियावर चुकीचे दावे, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : हरियाणातील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या मित्राला अटक केली आहे. या प्रकरणी कोणताही धार्मिक अँगल नाही.

नवी दिल्ली , विश्वास न्यूज : हरियाणातील काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सोशल मीडियावर एक धार्मिक अँगल जोडणारी पोस्ट व्हायरल होत आहे. दोन फोटो पोस्ट करुन एक दावा केला जातोय की हिमानी नरवालची हत्या काँग्रेसच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी केली यामध्ये एक फोटो हिमानी नरवालचा आहे, दुसरा फोटो सूटकेसचा आहे.
विश्वास न्यूजच्या पडताळणीत हे सत्य समोर आलं की पोलिसांनी हिमानी नरवाल हत्या प्रकरणी सचिन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. हिमानीच्या दाव्याला चुकीच्या दाव्यासह धार्मिक अँगल जोडून शेअर केलं जातंय.
व्हायरल पोस्ट
फेसबुक यूजर 'निशांत जोशी'ने 3 मार्च ला फोटो पोस्ट (अर्काईव्ह लिंक) करत म्हटलं.
"23 वर्षीय हिमानी नरवाल, हरियाणाची काँग्रेसची कार्यकर्ती होती, कोणत्यातरी काँग्रेसच्या अब्दुलनं सुटकेसमध्ये पॅक करुन फेकून दिलं!"

पडताळणी
व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी आम्ही व्हायरल फोटोंचा गुगल लेन्स सर्चसह शेअर केलं. सत्य हिंदी नावाच्या वेबसाईटवर पहिल्या फोटोला हिमानीचा असल्याचं सांगण्यात आलं. तर दुसरा फोटो हत्याकांडाशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं.

या नंतर आम्ही दैनिक जागरणची 4 मार्चची रोहतक आवृत्ती तपासून पाहिली. यामध्ये हिमानी नरवाल हत्याकांडाची छापलेली बातमी पाहायला मिळाली. त्यानुसार हिमानी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत चालली होती, ज्यामुळं ती चर्चेत आली होती. त्यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही काँग्रेस कार्यकर्त्याला नव्हे तर तिचा मित्र सचिनला अटक केली आहे. रोहतक पोलिसांनी झज्जर जिल्ह्यातील खैरपूर गावातील सचिनला दिल्लीतील मुंडका येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार पैशांच्या देवाणघेवाणीतून झालेल्या वादातून हिमानीची हत्या करण्यात आली. सचिनला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत सचिन सूटकेस घेऊन जाताना पाहायला मिळाला होता.

3 मार्चला अमर उजालाच्या वेबसाईटनं छापलेल्या बातमीनुसार, पोलिसांना सचिनजवळून हिमानीचा मोबाईल आणि दागिने मिळाले. आरोपी सचिन हा हिमानी नरवाल सोबत रिलेशनशिपमध्ये होता. दोघांची ओळख सोशल मीडियावरुन झालीहोती. रोहतकच्या सांपला बस स्टँडवर 1 मार्चला हिमानीचा मृतदेह सूटकेसमध्ये आढळला होता.

या बाबत रोहतक येथील दैनिक जागरणचे रिपोर्टर ओपी वशिष्ठ यांनी म्हटलं की हिमानी हत्याकांडातील आरोपीचं नाव सचिन आहे. यामध्ये कोणताही धार्मिक अँगल नाही.
या प्रकरणाला धार्मिक अँगल देणाऱ्या फेसबुक यूजरच्या प्रोफाईलची आम्ही पडताळणी केली. तो एका विचारधारेमुळं प्रभावित असून त्याचे 785 फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष : हरियाणात काँग्रेस नेत्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा मित्र सचिन याला अटक केलीय. यात धार्मिक अँगल नाही.
Claim Review : हिमानी नरवालची हत्या काँग्रेस कार्यकर्त्यानं केली.
Claimed By : FB User - Nishant Joshi
Fact Check : असत्य
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]























