तोंडाला मास्क, एकत्र प्रवास; घटस्फोटानंतर क्रिकेटर चहल अन् धनश्रीचा व्हिडिओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Reunite: 2025 मध्ये युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. ११ महिन्यांनंतर दोघांचा एकत्रित व्हिडिओ व्हायरल.

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Reunite: 2025 या वर्षात काही कपल्समध्ये दुरावा आला. क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या कपलने काडीमोड घेतला. दोघांच्या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली. दोघांमधील दुरावा येण्यामागचं कारण काय? हे अद्याप समोर आलेले नाही. घटस्फोटानंतर दोघे एकत्र दिसले नाहीत. मात्र, धनश्री चित्रपट आणि रिएलिटी शोमध्ये दिसली. पण अलिकडेच दोघे एकत्र दिसले आहेत. तब्बल 11 महिन्यानंतर चहल आणि धनश्री एकत्र दिसले. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, दोघेही एकत्र एका रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतील, असं म्हटलं जात आहे. तो रिअॅलिटी शो नेमका कोणता असणार? दोघांनी एकमेकांची भेट का घेतली? हे अनुत्तरित आहे.
View this post on Instagram
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा लवकरच एका रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती आहे. 'द 50' या रिअॅलिटी शोमधून दोघे एकत्र दिसणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी अद्यापची माहिती दिली नाही. तसेच अधिकृतपणे स्पर्धकांची यादीही जाहीर केलेली नाही.
रिअॅलिटी शोमधून युझी चहल अन् धनश्री एकत्र दिसणार?
वृत्तानुसार, 'द 50' हा रिअॅलिटी शो 1 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. हा शो सुरूवातीला जिओहॉटस्टारवर रात्री 9 वाजता प्रसारित होईल. तर, 'द 50' या रिअॅलिटी शोचे थेट प्रक्षेपण कलर्स मराठी या वाहिनीवर होणार आहे. रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान होणार असल्याची माहिती आहे. या रिअॅलिटी शोमध्ये युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एकत्र दिसणार का? हे लवकरच कळेल.
युजवेंद्र चहल आणि धनश्रीची भेट नेमकी कधी झाली?
कोव्हिड काळात लॉकडाऊनदरम्यान दोघांची भेट झाली. 2020 साली दोघेही विवाहबंधनात अडकले. दोघे एकत्रित फोटो सोशल मीडियात शेअर करत होते. मात्र, 4 वर्षांनंतर दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला. दोघांनी काडीमोड घेतला. सुरुवातीला दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, घटस्फोट घेत त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला. 2025मध्ये त्यांनी काडीमोड घेतला. घटस्फोटाच्या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. यानंतर तब्बल 11 महिन्यानंतर दोघेही एकत्र दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
८ वर्षांनंतर स्वीटी गुप्ताची एन्ट्री? मिर्झापूरबाबत श्रिया पिळगावकरची पोस्ट चर्चेत
























