एक्स्प्लोर

YouTube Record : रकुल प्रीतचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, पण यूट्युबवर सुसाट; 100 कोटी व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट

Jaya Janaki Nayaka YouTube Record : दाक्षिणात्य सुपरस्टार बेलमकोंडा साई श्रीनिवास आणि रकुल प्रीत सिंग यांच्या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने यूट्युबवर 100 कोटी व्ह्यूजचा टप्पा पार केला.

YouTube Movie World Record : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील (South Cinema) चित्रपटांची क्रेझ केवळ भारतातच नाही, तर जगभरात झपाट्याने वाढत आहे. अशातच आता एका दाक्षिणात्य चित्रपटाने थेट जागतिक पातळीवर एक असा ऐतिहासिक विक्रम केला आहे, जो आजवर कोणत्याही भारतीय किंवा हॉलिवूड चित्रपटालाही जमलेला नाही. दाक्षिणात्य सुपरस्टार बेलमकोंडा साई श्रीनिवास (Bellamkonda Sai Sreenivas) आणि बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) यांचा एक चित्रपट थेट यूट्युबवर तब्बल 1 बिलियन (100 कोटी) व्ह्यूज मिळवणारा जगातील पहिला चित्रपट ठरला आहे.

विशेष म्हणजे, 9 वर्षांपूर्वी जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला होता, तेव्हा तो बॉक्स ऑफिसवर वाईट रीतीने फ्लॉप ठरला होता. मात्र, आता यूट्युबवर (YouTube) या चित्रपटाने लोकप्रियतेचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.

Khoonkhar Hindi Dubbed : 'जया जानकी नायक' चे हिंदी व्हर्जन 'खूंखार' सुसाट

हा ऐतिहासिक विक्रम करणाऱ्या चित्रपटाचे नाव 'जया जानकी नायक' (Jaya Janaki Nayaka) असे आहे. हा मूळचा तेलगू भाषेतील रोमँटिक ॲक्शन-ड्रामा चित्रपट असून तो 2017 मध्ये रिलीज झाला होता. थिएटरमध्ये फ्लॉप झाल्यानंतर 'पेन मूव्हीज' (Pen Movies) या यूट्युब चॅनलने सुमारे 7 वर्षांपूर्वी (फेब्रुवारी 2019 मध्ये) या चित्रपटाचे हिंदी डब व्हर्जन 'खूंखार' (Khoonkhar) या नावाने युट्युबवर अपलोड केले होते.

उत्तर भारतातील आणि हिंदी भाषिक प्रेक्षकांनी या डब केलेल्या प्रवासाला डोक्यावर घेतले. चित्रपटातील दमदार ॲक्शन, कौटुंबिक ड्रामा आणि गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली, ज्यामुळे या एकाच व्हिडिओने तब्बल 1 बिलियन (1,000 दशलक्ष) पेक्षा जास्त व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे. युट्युबच्या इतिहासात 1 बिलियनचा टप्पा पार करणारा 'गंगनम स्टाईल' (Gangnam Style) हा पहिला संगीत व्हिडीओ (Music Video) होता, तर संपूर्ण चित्रपटांच्या (Full Movies) श्रेणीत 'खूंखार' हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

Jaya Janaki Nayaka Box Office Collection : 40 कोटींचे बजेट, बॉक्स ऑफिसवर मोठा तोटा

प्रसिद्ध मीडिया रिपोर्टनुसार, दिग्दर्शक बोयापाटी श्रीनू (Boyapati Srinu) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 2017 मध्ये जवळपास 40 कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर समीक्षकांचे खराब रिव्ह्यूज आणि संथ प्रतिसादामुळे या चित्रपटाला जगभरातून अवघ्या 20 कोटी रुपयांचीच कमाई करता आली होती. वितरकांना यात कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला होता. परंतु, डिजिटल विश्वाने आणि यूट्युबच्या प्रेक्षकांनी या फ्लॉप चित्रपटाला 'ब्लॉकबस्टर' बनवले आहे.

Director Boyapati Srinu Post : दिग्दर्शक आणि रकुल प्रीत सिंगने व्यक्त केला आनंद

चित्रपटाने हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर दिग्दर्शक बोयापाटी श्रीनू यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "1 बिलियन व्ह्यूज... 100 कोटी भावना... हा अविश्वसनीय टप्पा गाठणारा जगातील पहिला चित्रपट! 'जया जानकी नायक' (खूंखार) चित्रपटाला सदैव लक्षात राहणारा उत्सव बनवल्याबद्दल धन्यवाद. हा विक्रम तुमचाच आहे."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Boyapati Srinu (@boyapatisrinu_official)

तसेच, चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हिनेही इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. तिने लिहिले की, "काही व्यक्तिरेखा तुमच्यासोबत आयुष्यभर राहतात, 'जानकी' त्यापैकीच एक आहे. यूट्युबवर सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, हा खरोखरच एक विशेष पराक्रम आहे."

Allu Arjun Sarrainodu Missed Record : अल्लू अर्जुनचा 'सराईनोडू'ने रेकॉर्ड चुकवला

या शर्यतीत साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'सराईनोडू' (Sarrainodu) हा चित्रपट देखील होता. हा चित्रपट 1 बिलियन व्ह्यूज मिळवणारा पहिला चित्रपट ठरू शकला असता. मात्र युट्युबवरील काही तांत्रिक कारणांमुळे आणि करोडो व्ह्यूज असलेला तो जुना हिंदी डब व्हिडीओ चॅनलवरून डिलीट करून पुन्हा अपलोड करण्यात आल्यामुळे बेलमकोंडाच्या 'खूंखार' चित्रपटाने बाजी मारली. सध्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे साऊथ चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mithun Chakraborty Surgery Health: अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
अचानक रुग्णालयात दाखल, तातडीने ऑपरेशन... मिथुन चक्रवर्तींच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट
Raveena Tandon Dog Video: 'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
'ओह माय डॉग' रविना टंडनला कुत्रा चावला? नेमकं काय घडलं? रविना म्हणाली... VIDEO
Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget