एक्स्प्लोर

Yek Number : राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये दिसणार 'हा' रांगडा अभिनेता, 10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट

Yek Number Movie Release Date : बहुप्रतीक्षित असलेला "येक नंबर' हा चित्रपट 10 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दसऱ्याच्या सोन्यासोबतच चित्रपटाचाही आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे.

Yek Number Marathi Movie Update : राज ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित 'येक नंबर' चित्रपटाचे प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून या चित्रपटाबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर दिग्दर्शित 'येक नंबर' येत्या 10 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

राज ठाकरेंच्या बायोपिकमध्ये दिसणार 'हा' रांगडा अभिनेता

दसऱ्याचे औचित्य साधून 'येक नंबर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाशी इतके दिग्गज जोडले गेले आहेत की, चित्रपटाच्या घोषणेपासूनच याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरने ही उत्सुकता अधिकच वाढवली. प्रेक्षकांना या पोस्टरमधील तरुण कोण, हे जाणून घेण्याची प्रचंड इच्छा होती. तर आता या गोष्टीवरून पडदा उठला असून हा रांगड्या व्यक्तिमत्वाचा तरुण धैर्य घोलप असल्याचे समोर आले आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Dhairya 🕊️ (@dhairya_gholap)

10 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार चित्रपट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये चित्रपटाचा नायक धैर्य घोलप एका वेगळ्याच रूपात पाहायला मिळत असून, त्याच्या देहबोलीतूनच मनातील क्रोध व्यक्त होत आहे. याव्यतिरिक्त या पोस्टरमध्ये लक्षवेधी ठरत आहे, ती एक करारी नजर, जी महाराष्ट्राच्या परिचयाची आहे. या सगळ्यात अधिक भर घालत आहे, ते गूढ, रहस्यमयी संगीत. त्यामुळे या सगळ्यामागे नेमके काय दडले आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला ह्या 'येक नंबर' चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर या चित्रपटाला, मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीला आपल्या संगीतावर ठेका धरायला लावणारे, अजय -अतुल यांचे धमाकेदार संगीत लाभलं आहे. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची धुरा संजय मेमाणे यांनी सांभाळली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Dhairya 🕊️ (@dhairya_gholap)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक राजेश मापुस्कर म्हणतात, "या चित्रपटासाठी मला एक असा नवीन चेहरा हवा होता, जो प्रेक्षकांना आपल्यातलाच एक वाटेल. त्यामुळे धैर्यचा रांगडा लूक मला या व्यक्तिरेखेसाठी अतिशय योग्य वाटला. त्यानेही या व्यक्तिरेखेला उत्तम न्याय दिला आहे.''

'मराठी चित्रपटांमधील भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर दिसेल'

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ''प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.''

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड बवेश जानवलेकर यांनी सांगितलं आहे की, ‘सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत आणि अशा चित्रपटाशी आम्ही जोडले गेलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट, दर्जेदार आणि हिट चित्रपट दिले आहेत. आमची ही परंपरा या चित्रपटातही कायम राहील, याची आम्हाला खात्री आहे.’

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Raj Thackeray Biopic : लाव रे तो व्हिडीओ... मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयुष्यावरील बायोपिकची पहिली झलक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Embed widget