मुंबई पुणे मुंबई 4 कधी येणार? मुक्ता बर्वेला टॅग करत खुद्द स्वप्नील जोशीनं दिलं उत्तर, म्हणाला...
Mumbai Pune Mumbai 4: इंस्टाग्रामवर स्वप्नील जोशीच्या स्टोरीनंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ताची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे.
Mumbai Pune Mumbai 4: मुंबई पुणे मुंबईचे (Mumbai Pune Mumbai) आतापर्यंत 3 पार्ट आले आणि तिन्ही प्रेक्षकांच्या कसोटीवर खरे उतरले. अशातच आता गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी एक असलेल्या चित्रपटाचा चौथा पार्ट येणार (Mumbai Pune Mumbai 4) का? अशा चर्चा रंगल्या आहेत. मुक्ता बर्वे (Mukta Barve) आणि स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) अभिनीत हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. अशातच आता चौथ्या पार्टच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यासाठी कारण ठरतेय अभिनेता स्वप्निल जोशीचं वक्तव्य.
निर्माता अभिनेता स्वप्नील जोशी हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो आणि त्यातून तो त्याच्या नवनव्या प्रोजेक्ट्सबद्दल माहिती देत असतो. नुकतंच स्वप्नीलनं सोशल मीडियावर त्याच्या फॅन्ससोबत (Ask Me Anything) सेशन केलं, यात प्रेक्षकांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. पण याच सेशनमधल्या एका प्रश्नानं मात्र, लाखो प्रेक्षकांच्या मनातलीच गोष्टी स्वप्नीलपर्यंत पोहोचवली. यातल्या एका प्रश्नानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एका फॅननं स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई 4 येणार का? असा प्रश्न विचारल्यावर स्वप्नीलनं उत्तर देताना चक्क चित्रपटाच्या दिग्दर्शकांना म्हणजे, सतीश राजवाडे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला यात टॅग करून नेवर से नेवर असं लिहिलं. आता यातून स्वप्नील नेमकं काय म्हणायचंय, त्याच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? याबाबत चाहते तर्कवितर्क लावत बसले आहेत.
इंस्टाग्रामवर स्वप्नील जोशीच्या स्टोरीनंतर मुंबई पुणे मुंबई 4 नक्की येणार का? स्वप्नील आणि मुक्ताची सुपरहिट जोडी पुन्हा प्रेक्षकांना बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांना उधाण आलं आहे. मुंबई पुणे मुंबई या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं घर निर्माण केलं आहे, यात शंकाच नाही.
दरम्यान, सध्या स्वप्नील त्याच्या नव्या चित्रपटाची तयार करत असून येणाऱ्या वर्षात अनेक विविध भूमिका साकारणार आहे. 2024 वर्ष त्यानं वैविध्यपूर्ण प्रोजेक्ट्सनी गाजवलं आणि येणाऱ्या काळात देखील तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :