भारताची नवी नॅशनल क्रश होणार रणवीर सिंहची हिरोईन? 'शक्तिमान' चित्रपटात दिसण्याची दाट शक्यता!
वामिका गब्बी बहुचर्चित शक्तिमान या चित्रपटात दिसण्याची दाट शक्यता आहे. या चित्रपटात रणवीर सिंह एका सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंह याने स्वत:च्या हिमतीवर बॉलिवुडमध्ये स्वत:चं नाव कमवलं. आज तो बॉलिवुडमधील प्रतिष्ठीत आणि आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या तो धुरंधर चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. असे असतानाच त्याच्या आगामी शक्तिमान या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री दिसणार, असे विचारले जात होते. आता याच चित्रपटात सुंदर डोळ्यांमुळे नॅशनल क्रश म्हणून नावारुपाला आलेली वामिक गब्बी दिसण्याची शक्यता आहे.
वामिकाचा बेबी जॉन चित्रपट नुकताच प्रदर्शित
मिळालेल्या माहितीनुसार शक्तिमान या चित्रपटाचे दिग्दर्शन बेसिल जोसेफ करणार आहे. गेल्या साधारण पाच वर्षांपासून तो या चित्रपटावर काम करतोय. याच चित्रपटात रणवीर सिंह शक्तिमानची भूमिका पार पाडणार आहे. त्यासाठी त्याने तयारीदेखील चालू केली आहे. त्यानंतर आता वामिका गब्बी ही तरुण अभिनेत्रीदेखील रणवीर सिंहसोबत दिसण्याची शक्यता आहे. वामिका गब्बी ही अभिनेत्री नुकतेच बेबी जॉन या चित्रपटात दिसली होती. तिने या चित्रपटात वरुण धवन, कीर्ति सुरेश यासारख्या आघाडीच्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलेली आहे. बॉक्स ऑफिसवर मात्र हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आता ती शक्तिमान या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ती या चित्रपटात प्रमुख नायिकेची भूमिका वढवू शकते.
शक्तिमान चित्रपटात साकारणार नायिकेची भूमिका
शक्तिमान या चित्रपटात रणवीर सिंह सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून बेसिल जोसेफ या चित्रपटावर काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटात वामिका कोणत्या रुपात दिसणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कामाबाबत बोलायचं झाल्यास वामिका गब्बी बेबी जॉन या चित्रपटानंतर आदिवी शेष आणि इमरान हाश्मी यांच्या जी-2 या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टरदेखील वामिकाने आपल्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर शेअर केले आहे.
अनेक मोठ्या चित्रपटांत केलंय काम
वामिका गब्बी सध्या देशभरात चांगलीच चर्चेत आहे. मात्र 2007 साली तिने इम्तियाज अली यांच्या जब वी मेट या चित्रपटातून डेब्यू केला होता. या चित्रपटात वामिकाला करिना कपूरची चुलत बहीण दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर वामिकाने मौसम, बिट्टू बॉस, 83, खुफिया तसेच बेबी जॉन यासारख्या मोठ्या चित्रपटांत काम केलं आहे. त्यामुळे शक्तिमान या चित्रपटात वामिका काय कमाल करून दाखवणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
40 व्या वर्षी पहिलं लग्न अन् 2 वर्षातच मोडला संसार, आता खास व्यक्तीला डेट करतेय टॉप अभिनेत्री