एक्स्प्लोर

Mohini Colours Marathi Serial: सेटवर सुरू झालेली कथा, अस्तित्वात उतरेल का? कलर्स मराठीवर येतेय नवी मालिका

Mohini - Premachi Filmy Kahaani Colours Marathi Serial: मोहिनीचं एकच ध्येय आहे स्वतःचं आयुष्य सन्मानाने उभं करणं आणि तिच्या आईचा हरवलेला सन्मान व गौरव पुन्हा मिळवणं. आता मोहिनी हे सगळं कसं मिळवणार? कुठली संकटं तिच्या वाट्याला येणार? हे हळूहळू उलगडणार आहे.

Mohini - Premachi Filmy Kahaani Colours Marathi Serial: चंदेरी दुनियेचं आकर्षण, सोन्याच्या पडद्याची जादू… याला भुरळ पडत नाही असा कोणीच नाही. आजवर अनेक प्रेमकथा पाहिल्या आपण, पण ही प्रेमकथा आहे थोडी वेगळी कारण ही आहे अशा दोन व्यक्तींची कथा, ज्यांच्या आयुष्यात प्रेमापेक्षा स्वाभिमान आणि अहंकार आधी येतात. मनोरंजन सृष्टीचा झगमगाट, चाहत्यांची वेडी गर्दी आणि स्टारडमचा दिमाख… या सगळ्यांच्या मागे दडलेला संघर्ष, स्वप्नं आणि भावनांचा गुंता आणि त्यातून उलगडणारी RK आणि मोहिनीची प्रेमकथा, नवी मालिका ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. फिल्मी सेटवर जन्मलेली एक साधी मुलगी आणि त्याच जगावर राज्य करणारा सुपरस्टार… नियती, अहंकार आणि स्वाभिमान यांच्या संघर्षातून उभी राहणारी ही कथा प्रेक्षकांना एका भावनिक प्रवासावर घेऊन जाणार आहे. जगण्याने मोहिनीला खूप काही शिकवलं आहे ती एक लढवय्यी, संकटांना सामोरं जाणारी, बहुआयामी आणि अत्यंत स्ट्रीट-स्मार्ट स्त्री आहे. पडद्यामागच्या जगात वाढलेली ही मुलगी स्वतःच्या बळावर जगाला सामोरी जाते. जगण्यासाठी सुरू झालेला तिचा प्रवास पुढे जाऊन ताकद, प्रेम आणि स्वतःचं स्थान शोधण्याच्या प्रवासात बदलतो. मोहिनीचं एकच ध्येय आहे स्वतःचं आयुष्य सन्मानाने उभं करणं आणि तिच्या आईचा हरवलेला सन्मान व गौरव पुन्हा मिळवणं. आता मोहिनी हे सगळं कसं मिळवणार? कुठली संकटं तिच्या वाट्याला येणार? हे हळूहळू उलगडणार आहे.

मालिकेत कलाकारांची भक्कम फळी पाहायला मिळणार आहे   शालिनी (सोनाली पंडित नाईक), महेंद्र (शंतनू मोघे), ललिता (श्वेता मेहेंदळे),RK (समीर परांजपे), मोहिनी म्हणजेच अनघा ठाकूर आणि प्रताप (सुशील विश्वकर्मा) या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. 

या मालिकेची कथा मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेल्या मोहिनीभोवती फिरते. तिची आई शालिनी ही एका भीषण परिस्थितीतून स्वतःला, मोहिनीला आणि तिच्या होणाऱ्या मुलाला वाचवून आलेली स्त्री आहे. तर महेंद्र हा फिल्म इंडस्ट्रीतील ॲक्शन डायरेक्टर ज्याने शालिनीला आणि तिच्या मुलींना जपलं. अनेक वर्षांनी अभिनेत्री सोनाली पंडित नाईक या मालिकेद्वारे मराठी मालिकांमध्ये 10 वर्षांनी पुनरागमन करत आहेत. महेंद्र, मोहिनी आणि कार्तिकीला स्वतःच्या नावाने वाढवतो आणि त्यांच्यासाठी आधार बनतो. लाईट्स, कॅमेरे आणि मेकअप रूम्समध्ये वाढलेली मोहिनी पुढे जाऊन मेकअप आर्टिस्ट बनते. पण तिच्या आयुष्यात एक मोठं वळण येतं जेव्हा तिची भेट होते  heartthrob, अहंकारी आणि लोकप्रिय सुपरस्टार RK (समीर परांजपे) शी. देशभरात चाहत्यांचा लाडका असलेला RK बाहेरून जितका शक्तिशाली आणि आत्मविश्वासी दिसतो, तितक्याच खोल जखमा त्याच्या भूतकाळात दडलेल्या आहेत. मोहिनी सन्मान शोधते, तर RK egoistic आहे. त्यांच्या पहिल्या भेटीतच संघर्ष निर्माण होतो आणि त्यातून सुरू होतं एक गुंतागुंतीचं नातं जे अहंकारातून सुरू होतं, सूडातून पुढे जातं आणि शेवटी भावनांच्या वेगळ्याच वळणावर पोहोचतं. नक्की कशी असेल फुलात जाईल ही प्रेमकथा? काय घडेल पुढे?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या नव्या मालिकेबद्दल बोलताना Executive Vice President, Marathi Cluster,  सतीश राजवाडे म्हणाले, "कलर्स मराठी नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगळ्या आणि भावनिकदृष्ट्या जोडणाऱ्या कथा घेऊन येत असते. 'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी' ही एक वेगळ्या धाटणीची मालिका आहे. चंदेरी पडद्यावर वावरणाऱ्या लोकांची आणि त्यांच्या आयुष्याबद्दल उत्सुकता निर्माण करणारी ही मालिका त्यांच्या आयुष्यात काय घटना आणि नाट्य घडेल हे दाखवेल. एक प्रेमकहाणी जी रसिकांना उत्सुक करेल आणि खिळवून ठेवेल. अलगद नातेसंबंध उलगडणारी ही मालिका प्रेक्षकांना नक्की आवडेल."

शालिनीचे पात्र साकारणाऱ्या सोनाली पंडित नाईक म्हणाल्या, "मोहिनी हा शो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मी प्रदीर्घ काळानंतर मराठी टेलिव्हिजनवर येते आहे. त्यामुळे माझ्या मनाच्या जवळ असलेला हा शो आहे. माझी मैत्रीण producer आहे. कसं असतं प्रत्येकाला वाटतं आपला रोल हा कायमच चर्चेत रहावा,लोकांना आवडावा, समाधान मिळावं. शालिनी पात्र सोनालीपेक्षा जशी आहे त्याहून वेगळे आहे, आणि त्यामुळेचं मज्जा येते करायला. ती सोशिक आहे, तिने पूर्व आयुष्यात खूप सोसलं आहे आणि त्यामुळे तिने दिलेल्या लढ्यामुळे ती प्रचंड खंबीर झाली आहे. मुळात सोनालीचा स्वभाव वेगळा असल्याने हा रोल आव्हानात्मक आहे. पण, सोनाली शालिनी इतकीच strong आहे. त्यामुळे ज्याप्रकारे शालिनी तिच्या कुटुंबासोबत उभी आहे त्याला मी रिलेट करते. शालिनी आणि ही मालिका माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे, तुम्ही आमच्या मालिकेला प्रेम द्याल अशी मला आशा आहे.

महेंद्रचे पात्र साकारणारे शंतनू मोघे म्हणाले, “या मालिकेत मी मोहिनीच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. महेंद्र हा व्यवसायाने स्टंट, ॲक्शन डायरेक्टर आहे. त्यामुळे बाहेरून तो जरी रफ अँड टफ वाटत असला, तरी तो कौटुंबिक मूल्यांना खूप महत्त्व देतो. आपल्या मुली मोहिनी आणि कार्तिकी यांना स्वतंत्रपणे उभं राहायला शिकवणारा, आयुष्याच्या लढ्यासाठी त्यांना सक्षम बनवणारा आणि आपल्या पत्नीला कायम पाठिंबा देणारा असा तो माणूस आहे. या पात्रात अनेक वेगवेगळ्या छटा आहेत आणि ते साकारताना खूप छान अनुभव येतो आहे. प्रेक्षकांनाही आमची ही मालिका नक्की आवडेल, अशी मला खात्री आहे.”

RK म्हणजेच समीर परांजपे म्हणाला, "मोहिनी मालिकेच्या निमित्तानं कलर्स मराठीवर पुन्हाएकदा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे याचा आनंद आहे. घरी आल्याचा भाव आहे. प्रत्येक अभिनेत्याला वेगळ्या धाटणीच्या भूमिका कराव्यात अशी इच्छा असते कारण एकप्रकारची भीती असते आणि ती म्हणजे आपण typecast तर होणार नाहीना. मी आभारी आहे कलर्स मराठीचा की मला पुन्हा वेगळं पात्र साकारण्याची संधी दिली... ज्याचा कॅनव्हास वेगळा आहे, कथा वेगळी आहे. मोहिनी मालिकेसारखं कथानक मला वाटतं नाही मराठी टेलिव्हिजनवर झालं आहे. अशा कथानकच भाग होण्याची संधी मिळणे माझं भाग्य आहे असं म्हणेन. अशी मालिका करणं खूप मोठं धाडस आहे. नवीन शो, नवी भूमिका जो माझं पिंड नाही हे खूप मोठं आव्हानं आहे. मी कधी न साकारलेलं पात्र करतो आहे हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव आहे... मी रोज नव्याने हे पात्र जगतो आहे. प्रेक्षकांना नक्कीच बघायला मज्जा येणार आहे याची खात्री आहे."

'मोहिनी - प्रेमाची फिल्मी कहाणी' प्रेक्षकांना एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाणार आहे. जसजशी मोहिनी स्वतःचा मार्ग शोधू लागते, तसतशी ती त्या फिल्म इंडस्ट्रीमध्येच स्वतःची ओळख निर्माण करू लागते ज्याच्या झगमगाटात कधीकाळी तिचं अस्तित्वच झाकोळलं गेलं होतं. या मालिकेत विश्वासघात, सूड, ओळख आणि जिद्द यांसारख्या प्रभावी भावनांचा वेध घेत प्रेक्षकांना बॉलिवूडच्या चकाकीमागील गडद वास्तवाचा एक भावनिक रोलरकोस्टर अनुभवायला मिळणार आहे. पडद्यामागच्या संघर्षातून स्वतःचं स्थान निर्माण करणारी मोहिनी आणि अहंकाराच्या भिंतीत अडकलेला सुपरस्टार RK यांच्या आयुष्यात नियती काय वळण आणणार हे पाहण्यासाठी नक्की पहा 'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी'. 

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
'.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
मिथिला पालकरचा 'असा' अवतार कधीच पाहिला नसेल; क्राईम थ्रिलरचा टीझर पाहिलात?
Genelia Deshmukh Riteish Deshmukh: रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा
रितेश भाऊंनी जिनेलिया वहिनींना पहिला मराठी सिनेमा कोणता दाखवला? अभिनेत्रीने सांगितला खास किस्सा

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
Embed widget