Reema Lagoo Vivek Lagoo Love Story : रंगभूमीवर फुललेली अनोखी प्रेमकहाणी, घटस्फोटानंतरही टिकलेलं मैत्रीचं नातं; कशी झालेली Reema-Vivek Lagoo यांची पहिली भेट?
Reema Lagoo - Vivek Lagoo Love Story : विवेक लागूंची आणखी एक ओळख सांगायची तर, दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती. काही वर्षांआधी रीमा लागू यांचं निधन झालं.

Reema Lagoo - Vivek Lagoo Love Story : मराठी इंडस्ट्रीतलं (Marathi Film Industry) मोठं नाव, ज्यांनी दिग्दर्शनापासून अगदी लेखन, अभिनयातही आपली छाप सोडली, ते म्हणजे, विवेक लागू (Vivek Lagoo). गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि मराठी इंडस्ट्रीनं लखलखता हिरा गमावला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. विवेक लागूंबाबत अगदी थोडक्यात सांगायचं तर, अतिशय शिस्तप्रिय आणि रंगभूमीसाठी झटणारा नट. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं. पण, यापेक्षाही त्यांना सर्वात जास्त ओढ होती ती, रंगभूमीची. रंगभूमीसाठी झटणाऱ्या, रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या अशा एका गुणी नटानं 19 जून रोजी वयाच्या 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि अवधी मराठी मनोरंजनसृष्टी हळहळली.
विवेक लागूंची आणखी एक ओळख सांगायची तर, दिवंगत अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती. काही वर्षांआधी रीमा लागू यांचं निधन झालं. पण, एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतरही त्यांनी एकत्र काम केलं होतं. रिमा लागू आणि विवेक लागू यांची लव्हस्टोरीही तितकीच हटके आहे. दोघांना एक मुलगी आहे. तिनंही आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, इंडस्ट्रीत काम करतेय. ती उत्तम लेखिका आहे.
Vivek Lagoo आणि Reema Lagoo एकमेकांना भेटले कुठे?
1976 मध्ये रिमा लागू यांनी मुंबईच्या युनियन बँकेत काम करायला सुरुवात केली. बँकेत काम करत असताना, त्या इथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत होत्या. यासोबतच त्या टीव्ही सीरिअल्स आणि चित्रपटांमध्येही नशीब आजमावत होत्या. अशातच रिमा लागू विवेक लागूंना भेटल्या, दोघंही बँकेत एकत्र काम करायचे. त्यावेळी Vivek Lagoo नाट्यसृष्टीत नट म्हणून प्रसिद्ध होते. अभिनयात रस असल्यानं दोघांमध्ये जवळीक वाढली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले.
पुढे दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 1978 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांना एक गोंडस मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर मात्र काहीच वर्षात त्यांच्या नात्यात दुरावा आला. दोघांनीही एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण, मुलीसाठी मात्र ते नेहमीच एकत्र यायचे. दोघांच्या घटस्फोटानंतर इंडस्ट्रीतही खळबळ माजली होती. पण, दोघांनीही कधीच घटस्फोट का झाला? याबाबत वाच्यता केली नाही.
दोघांनी सामंजस्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. विवेक यांनी स्वत:हून मुलीची जबाबदारी रीमा यांच्याकडे दिली होती. घटस्फोटानंतर रिमा यांनी मृण्मयीचा सांभाळ केला. आज मृण्मयीदेखील आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत नाटक, सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवतेय. मृण्मयीनं हिंदीच थप्पड, स्कुप सारख्या सिनेमांचं लेखन केलं आहे.
घटस्फोटानंतरही दोघंही एकत्र करायचे काम
Reema Lagoo आणि Vivek Lagoo एकमेकांपासून वेगळे झाले. पण, घटस्फोटानंतरही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. घटस्फोटानंतरही दोघांनी दुसरं लग्न करण्याचा विचार केला नाही. एका मुलाखतीत बोलताना विवेक लागूंनी एक वक्तव्य केलेलं. "प्रेम आणि लग्न एकदाच होतं. ते एकदा संपलं की संपलं", असं ते म्हणाले होते. 2014 'दुसरा सिलसिला' या नाटकात एकत्र काम केलं होतं.
उत्तम दिग्दर्शक, लेखक अन् नट होते Vivek Lagoo
'चल आटप लवकर', 'प्रकरण दुसरे', 'सर्वस्वी तुझीच' ही विवेक लागू यांनी लिहिलेली नाटकं आहेत. 'तर तुला मी ... मला मी' हे त्यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक. 'आबोल झाली सतार', 'आपलं बुवा असं आहे', 'कोपता वास्तुदेवता', 'जंगली कबुतर', 'बीज', 'रानभूल', 'सूर्यास्त', 'स्पर्श' सारख्या नाटकात विवेक यांनी काम केलं आहे. 'व्हॉट अबाऊट सावरकर', 'अग्ली', '31 दिवस' या चित्रपटांममध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय 'चार दिवस सासूचे' , 'हे मन बावरे' या गाजलेल्या मालिकांमध्येही त्यांनी काम केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























