Vitthala Tuch : 'सखे तुझं लाजणं’, नवरात्रीच्या माहोलात 'विठ्ठला तूच' चित्रपटातील प्रेममय गीत प्रेक्षकांच्या भेटीला!
Sakhe Tuza Lajana : सध्या सगळीकडे रोमॅंटिक गाण्यांचा माहोल असतानाच यात भर घालत 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
Vitthala Tuch : कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनंतर जल्लोषात सण साजरे होत आहेत. गणपती बाप्पाचा निरोप घेतल्यानंतर आता सगळीकडे देवी आईच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. गरबा, दांडिया या जल्लोषमय वातावरणात यंदाचा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. या नवरात्रीच्या माहोलात आता एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘विठ्ठला तूच’ (Vitthala Tuch) या चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ (Sakhe Tuza Lajana) हे रोमँटिक गाणं सर्वांनाच आपल्या तालावर डोलायला लावणार आहे.
सध्या सगळीकडे रोमॅंटिक गाण्यांचा माहोल असतानाच यात भर घालत 'विठ्ठला तूच' चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. नवरात्रीचे औचित्य साधत हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. नवरात्रीच्या माहोलात 'सखे तुझं लाजणं' या गाण्याचे ठेका धरायला लावणारे बिट्स रसिकांना नक्कीच मोहित करणार आहेत.
पाहा गाणे :
यंदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार यात वादच नाही. 'वाय.जे. प्रॉडक्शन' निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' या चित्रपटातील हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. 'सखे तुझं लाजणं' (Sakhe Tuza Lajana) हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ आहे, ज्यात प्रेमाच्या भावना आहेत, सुंदर असे नृत्य आहे आणि जोडीला बॉलिवूडचा फिल देणाऱ्या व्हाईब्सही आहेत. नवोदित आणि चित्रपटाचा मुख्य नायक योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बिबे ही जोडी पहिल्यांदाच या चित्रपटात अन् गाण्यात एकत्र दिसणार आहे.
'विठ्ठला तूच तूच तू'ला मिळाली प्रेक्षकांची पसंती
'विठ्ठला तूच’ या चित्रपटातील 'विठ्ठला तूच तूच तू' हे भक्तिमय गीत आषाढी एकादशीचे निमित्त साधत रिलीज करण्यात आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. या गाण्याप्रमाणेच चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' (Sakhe Tuza Lajana) हे गाणंही प्रेमी बांधव डोक्यावर उचलून धरतील, अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे आणि सुप्रसिद्ध गायक जावेद अली यांनी हे गाणे सुरबद्ध केले आहे. तर, 'सखे तुझं लाजणं' या गाण्याला संगीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी दिले असून, या गाण्याच्या कोरियोग्राफीची जबाबदारी योगेश जम्मा यांनी सांभाळली आहे. या गाण्याचे बोल विनायक पवार यांनी लिहिले आहेत. 'विठ्ठला तूच' चित्रपटाची कथा ही रोमँटिक आहे, आणि चित्रपटातील 'सखे तुझं लाजणं' हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या दिलावर राज्य करायलाही सज्ज झाले आहे.
हेही वाचा :