एक्स्प्लोर

Virat Kohli Restaurant One8 Menu: विराट कोहलीचं जुहूतलं रेस्टॉरंट किशोर कुमारांच्या बंगल्यात; मेन्यू खूपच वर्सटाईल, पण किमती तेवढ्याच एक्सक्लुझिव्ह...

Virat Kohli Restaurant One8 Menu: विराट कोहलीच्या One8 Commune या खास वेंचरचे देशभरात 10 शानदार आऊटलेट्स आहेत. पण, मुंबईच्या जुहूतील आऊटलेट इतर आऊटलेपेक्षा वेगळं आहे.

Virat Kohli Restaurant One8 Menu: भारतीय क्रिकेट टीमची (Indian Cricket Team) रन मशीन आणि जगभरातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंमध्ये अव्वल असलेला खेळाडू म्हणजे, विराट कोहली (Virat Kohli). विराट जेवढा मैदानात हुशारीनं खेळतो, तेवढाच तो बिझनेसमध्येही स्मार्ट आहे. क्रिकेटनंतर जर विराट कशावर प्रेम करत असेल, तर ते जेवणावर, खाण्यावर... आजवरच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यानं स्वतः हे बोलताना मान्य केलं आहे. आपली हीच आवड जपत विराट कोहलीनं एक रेस्टॉरंट सुरू केलं आहे. ज्याचं नाव आहे, One8 Commune. विराट कोहलीच्या या खास वेंचरचे देशभरात 10 शानदार आऊटलेट्स आहेत. पण, मुंबईच्या जुहूतील आऊटलेट इतर आऊटलेपेक्षा वेगळं आहे. कारण, विराट कोहलीचं मुंबईतील हॉटेल बनलंय बॉलिवूडमधले दिग्गज सिंगर किशोर कुमार यांच्या बंगल्यात. विराटचं या जागेवर विशेष प्रेम आहे आणि त्यानं स्वतः लक्ष घालून किशोर कुमारांच्या घराचं हॉटेलमध्ये रुपांतर केलं आहे. 

किशोर दांसोबत विराट कोहलीचं खास कनेक्शन 

2022 मध्ये जेव्हा विराट कोहलीनं जुहूचं One8 Commune लॉन्च केलं, त्यावेळी त्यानं सांगितलेलं की, त्याचं किशोर दांसोबत एक इमोशनल कनेक्शन आहे. आपल्या रेस्टॉरंटच्या युट्यूब चॅनलवर विराट कोहली म्हणालेला की, "जर मला एखाद्या जग सोडून गेलेल्या व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली तर मी नेहमीच सांगीन की, मला किशोर दांना भेटायचंय... त्यांची पर्सनॅलिटी खूपच जादुई होती... आणि त्यांची गाणी थेट आपल्या काळजाला हात घालतात... " जुहूतलं आऊटलेट डिझाइन करताना विराट आणि त्याच्या टीमनं बंगल्याची आत्मा आणि होमली फील कायम राहील याची काळजी घेतली आहे. 

विराटची जर्सी, ग्लास रूफ आणि 'सुपरफूड' मेन्यू

One8 Commune हे वेंचर नेम विराट कोहलीच्या जर्सी नंबर 18 वरुन घेण्यात आलं आहे. हॉटेलमध्ये त्याची जर्सी भिंतीवर लावण्यात आली आहे. रेस्टोरेंटचं संपूर्ण छत काचेचं आहे. ज्यामुळे दिवसभर नॅच्युरल सनलाईट मिळते आणि वाईब एकदम पॉझिटिव्ह राहते. विराटचं म्हणणं आहे की, चांगल्या जागेत तेव्हाच यश मिळतं, जेव्हा तिथलं जेवण तितकंच शानदार असतं. त्यामुळे त्याच्या मेन्यूमध्ये इंडियन, सीफूड, प्लांट बेस्ड आणि व्हेजिटेरियन ऑप्शन्स आहेत.

विराट कोहलीच्या रेस्टॉरंट्सच्या मेन्यूच्या किमती व्हायरल 

विराट कोहलीच्या लग्झरी रेस्टॉरंटमध्ये खाण्याचा अनुभव जेवढा प्रीमियम आहे, दरही तेवढेच एक्सक्लुझिव्ह आहेत... 

  • स्टीम्ड राईस : 318 रुपये
  • फ्रेंच फ्राइज: 348 रुपये
  • तंदूरी रोटी: 118 रुपये
  • 'बेबी' नान: 118 रुपये

दिल्लीपासून जयपूरपर्यंत पसरलंय विराटचं 'फूड एम्पायर'

विराट कोहलीचं पहिलं One8 Commune दिल्लीच्या एरोसिटीमध्ये सुरू झालेलं. यानंतर पंजाबी बाग, गुरुग्राम, लोअर परेल (मुंबई), बंगळुरू, कोलकाता, पुणे, इंदौर आणि जयपूरमध्येही याचे आऊटलेट्स उघडण्यात आले. बंगळुरूचं आऊटलेटही खास आहे कारण, ते  एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाजूलाच आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Lives In 100 Year Old Bungalow: 100 वर्ष जुन्या आलिशान बंगल्यात राहते सैफ अली खानची 'ही' हिरोईन; शाहरुखच्या मन्नतपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर हिचं घर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2025 | सोमवार
Embed widget