(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : विराटने दिलेले 'हे' चॅलेंज अनुष्काने केले लिलया पार, विराट कोहलीची पुन्हा हार
Viral Video : विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये विराट आणि अनुष्का आपल्या दोन बोटांवर बॅटचा बॅलेंस सांभाळताना दिसत आहेत.
Viral Video : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा आणि अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये हे दोघेही आपल्या दोन बोटांवर बॅटचा बॅलेंस सांभाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हे चॅलेंज विराटने अनुष्काला दिले होते ते अनुष्काने लिलया पार पाडल्याने विराटची हार झाल्याचं दिसून येतंय.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर दिसून येतंय की एकीकडे विराटला आपल्या दोन बोटांवर उभ्या असलेल्या बॅटचा बॅलेंस सांभाळण्या्साठी अडचणी येत आहेत तर दुसरीकडे अनुष्का शर्मा सहजरित्या हे साध्य करत आहेत. दोन वेगवेगळ्या व्हिडीओचा कोलाज बनवण्यात आला आहे. एका व्हिडीओमध्ये अनुष्का दिसतेय तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये विराट दिसतोय. विराट आपल्या दोन बोटांवर बॅटचा बॅलेंस साधत असताना दुसऱ्या हाताने मोबाईलही ऑपरेट करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय.
या व्हिडीओमध्ये विराट कोहली म्हणतो की, "चला, आता तुझी वेळ, तू हे करुन दाखव." त्यानंतर अनुष्काने एक व्हिडीओ शेअर करुन लिहलं की, "विराटनं दिलेलं टका टक बॅट बॅलेन्स चॅलेंज करताना मला खूप मजा आली. आता तुम्हीही आपले स्किल दाखवा." या पोस्टवर विराट आणि अनुष्काचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत.
View this post on Instagram
विरुष्का अर्थात विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का यांची जोडी म्हणजे एक हिट जोडी समजली जाते. या दोघांनी आपले प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ ज्या पद्धतीने सांभाळलंय ते पाहून अनेकांना हेवा वाटतो. क्रिकेटपटू जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे यांच्या लग्नातील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यामध्ये विराटने अनुष्काचा दुपट्टा ओढल्याचं आणि त्यावर अनुष्कानेही वेगळं एक्सप्रेशन दिल्याचं दिसत आहे.
काही महिन्यांपूर्वीच अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव वामिका ठेवण्यात आलं आहे. सध्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ही जोडी इंग्लंमध्ये आहे आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Update : सलग सहाव्या दिवशी देशात 50 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, तर दुसऱ्या दिवशी हजाराहून कमी रुग्णांचा मृत्यू
- Gold Silver Price Today : चांदीचा भाव आजही वधारला, तर सोने 'जैसे थे'; जाणून घ्या आजचा भाव
- कंगना रनौतचा दावा खोटा अन् कोर्टाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका