Gold Silver Price Today : चांदीचा भाव आजही वधारला, तर सोने 'जैसे थे'; जाणून घ्या आजचा भाव
Gold Silver Price :आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाल्याने परिणामी त्याची मागणी घटली आहे. त्यामुळेच सोन्याचे भाव घसरले आहेत.
मुंबई : चांदीच्या भावात गेली काही दिवस सुरु असणारी वाढ आजही कायम राहिली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता एक किलो चांदीसाठी 69,200 रुपये मोजावे लागणार आहेत. त्या तुलनेत सोन्याच्या भावात अगदीच किरकोळ बदल होत असल्याचं दिसतंय. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,250 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,250 रुपये इतका आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचा भाव हा सर्वाधिक कमी आहे.
गेली काही दिवस चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार सुरु आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना चांदीच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजचा एक किलो चांदीचा भाव हा 69,200 रुपये इतका झाला आहे. तर सोन्याच्या भावात केवळ दहा रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,250 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,250 रुपये इतका आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याचा भाव हा सर्वाधिक कमी आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात सर्वाधिक कमी किंमत आल्याचं पहायला मिळतंय.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास दहा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :