Viral Regional Songs : 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' भाषेच्या चौकटी मोडणाऱ्या गाण्यांना तरुणाईची पसंती
Viral Regional Songs : 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' अशा अनेक गाण्यांनी भाषेच्या चौकटी मोडल्या आहेत. जगभरातील प्रेक्षकांनी या गाण्यांना प्रतिसाद दिला. जाणून घेऊयात 2023 मध्ये आणि सध्या कोणती गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत....
Viral Regional Songs : सध्या तरुण पिढी सोशल मीडियावर सातत्याने सक्रीय असते. इन्स्टाग्राम (Instagram), फेसबुक (Facebook) आणि युट्युब (Youtube) अशा सोशल मीडियावरिल अनेक प्लॅटफॉर्म्सवर सध्या रिल्स पाहण्यात सर्वांना आनंद मिळतो. रिल्सवर भन्नाट गाणी, डान्स, आणि कॉमेडीचे व्हिडिओ पाहण्यात आपण वेळ घालवत असतो. 2023 मध्ये अनेक हिट गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' अशा अनेक गाण्यांनी भाषेच्या चौकटी मोडल्या. जगभरातील प्रेक्षकांनी या गाण्यांना प्रतिसाद दिला. जाणून घेऊयात 2023 मध्ये आणि सध्या कोणती गाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत....
अॅनिमलमधील 'जमाल कडू' (Jamal song)
अभिनेता रणवीर कपूर, रश्मिका मांदना आणि बॉबी देओल यांची भूमिका असलेला अॅनिमला हा सिनेमा 2023 च्या अंतिम टप्प्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सिनेमाच्या तुफान चर्चा रंगल्या. अतोनात हिंसाचार बोल्ड सीन असलेल्या या सिनेमातील जमाल कडू या गाण्याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. सिनेमा रिलीज होऊन अनेक महिने लोटले असले तरी अजूनही इन्स्टाग्राम रिल्सपासून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या गाण्याच्याच चर्चा आहेत. अनेक जण बॉबी देओलच्या डास्नची स्टेप कॉपी करुन व्हिडिओ बनवताना दिसत आहेत.
गुलाबी शरारा (Gulabi Sharara Song)
अॅनिमलच्या (Animal Movie) जमाल कडू याबरोबरच गुलाबी शरारा या गाण्यानेही सोशल मीडियावर (Social Media) धुमाकुळ घातलाय. अनेक तरुण-तरुणी या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसत आहेत. शिवाय, वेगवेगळ्या ठिकाणी एकाच स्टेपवर या डान्स केला जातोय. त्यामुळे हे गाणेही एकदम हिट झाले आहे.
बादल बरसावर तरुणींचा तुफान डान्स
गुलाबी शरारावर तरुणांना जसा डान्स केला. तसाच डान्स बादल बरसा या गाण्यावरही केला आहे. जमाल कडू आणि गुलाबी शरारा नंतर बादल बरसा हे गाणंही तुफान गाजताना दिसतय. बादल बरसावर डान्स करण्यात तरुणींनी पसंती दिली आहे. याशिवाय, गुजराती भाषेतील खलासी या गाण्यानेही काही काळ इन्स्टाग्रामवर धुमाकुळ घातला होता.
भाषेच्या चौकटी मोडल्या
गुलाबी शरारा, जमाल कडू यांसारख्या गाण्यांनी भाषेच्या चौकडी मोडल्यात. जगभरातील प्रेक्षकांनी या गाण्यांना प्रतिसाद दिलाय. गाण्याचा अर्थ समजणार नाही, अशाही लोकांनी या गाण्यावर तुफान डान्स करत व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या