Liger: काही रडल्या तर काही बेशुद्ध पडल्या; विजयला पाहिल्यानंतर फिमेल फॅन्सची रिअॅक्शन, थांबवावे लागले प्रमोशन
काही दिवसांपूर्वी मुंबईमधील एका मॉलमध्ये विजय (Vijay Deverakonda) हा प्रमोशनसाठी गेला होती.

Vijay Deverakonda : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लायगर (Liger) हा चित्रफट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात विजयसोबतच अनन्या पांडे (Ananya Panday) देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. विजय आणि अनन्या सध्या लायगर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. विजयचा चाहता वर्ग मोठा आहे. तो ज्या ठिकाणी प्रमोशनला जातो, तिथे त्याला पाहण्यासाठी त्याचे चाहते गर्दी करतात. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील एका मॉलमध्ये विजय हा प्रमोशनसाठी गेला होती. यावेळी विजयला पाहून अनेक मुलीच्या डोळ्यातून अश्रू आले. तर काही तरुणी या बेशुद्ध पडल्या.
विजय मुंबईमधील एका मॉलमध्ये प्रमोशनसाठी गेला होता. जिथे त्याला पाहण्यासाठी हजारो लोक आले होते. मॉलच्या मधोमध बांधलेल्या स्टेजवर विजय येताच प्रेक्षक अनियंत्रित झाले. एका रिपोर्टनुसार, विजय स्टेजवर येताच सर्वत्र आवाज येऊ लागले. हे पाहून आयोजकांना धक्काच बसला. काही महिला चाहत्या बेशुद्ध झाल्या तर काही रडू लागल्या. अनेक चाहत्यांनी विजयचे पोस्टर आणि स्केचेस आणले होते. काही चाहते बॅरिकेड्सला धक्का देऊन स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे विजय आणि अनन्या हे इव्हेंटमधून निघून गेले. त्यामुळे प्रमोशन मध्येच थांबवावे लागले.
"Namaskar Mumbai
— ~Aditi🌸 (@tazbu_forever) July 31, 2022
Kasa ahe tumhi loka" 😭💘
He spoke marathi and Hindi throughout 😭🤩🤌feels sooo nostalgic 💘🔥
Dead dead deaddddddd 😭#VijayDeverakonda #Liger pic.twitter.com/XzvmPEmswO
लायगर चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जन्ननाथ यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती ही करण जोहरनं केली आहे. 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. मुंबई, अमेरिका, लास वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी 'लायगर' या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील 'अकडी पकडी' हे गाणं रिलीज झालं.
हेही वाचा:























