Chhaava Movie : 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशल भारावला, केली खास पोस्ट; म्हणाला...
Chhaava Movie : 'छावा' चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे.

Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट 'छावा' (Chhaava Movie) शुक्रवारी प्रदर्शित झाला. अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal) व तेलगू अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता विक्की कौशलने संभाजी महाराजांची भूमिका आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. दोघांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'छावा'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर विक्की कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाला विक्की कौशल?
विक्की कौशलने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलंय की, 'छावा'नं रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सगळीकडून विक्की कौशलवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच आता विक्कीनं चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. विक्की कौशलनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "तुमच्या प्रेमामुळे आज 'छावा' खऱ्या अर्थानं जिवंत झाला. तुमचे मेसेज, फोन, व्हिडीओ, चित्रपट पाहताना तुम्हाला आलेले अनुभव... या सगळ्या गोष्टी पाहून मी भारावून गेलोय. मी सगळं काही पाहतोय… आणि चित्रपटाला मिळणारं प्रेम पाहून प्रचंड सुखावलोय. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मन:पूर्वक आभार… छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा सिनेमागृहांमध्ये जाऊन अनुभवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार… विश्वास आपके साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!, असे विक्की कौशलने म्हटले आहे.
View this post on Instagram
'छावा'ने पहिल्या दिवशी किती कमावले?
'छावा' हा चित्रपट 130 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 31 कोटींची कमाई केली आहे. ‘छावा’ चित्रपटाची सध्याची बॉक्स ऑफिस कमाईची आकडेवारी पाहता चित्रपट येत्या काही दिवसांत कलेक्शनमध्ये इतिहास रचणार असा अंदाज अनेक चित्रपट समीक्षकांनी मांडला आहे. या वर्षी आतापर्यंत कोणत्याही हिंदी चित्रपटाला इतकी मोठी ओपनिंग मिळालेली नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत विक्की कौशलचे वजन वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
