एक्स्प्लोर

मिरजच्या तंतुवाद्य परंपरेला मानाचा तुरा! ज्येष्ठ सतारमेकर युसुफ घुडूलाल मुल्ला यांना “उत्कृष्ट तंतुवाद्य निर्माते” पुरस्कार

आज तंतुवाद्य निर्मितीत परंपरागत कौशल्य जपणारे कारागीर मोजकेच उरले आहेत, आणि या मोजक्या उस्तादांमध्ये युसुफ मुल्ला यांचे स्थान अत्यंत मानाचे समजले जाते.

Mumbai: सितारेची एखादी धून मनात अगदी हवेच्या लहरीसारखी जाते आणि कितीतरी काळ घर करून राहते. ही वाजवणाऱ्या कलाकाराची जेवढी कमाल तेवढीच किंबहुना त्याहूनही काकणभर अधिक वादय बनवणाऱ्याच्या हाताची. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे .. ही बा.भ. बोरकर यांच्या कवितेतील या ओळी कुठल्याही तंतुवाद्य निर्मात्याला चपखल लागू पडणाऱ्या. भारतात सितार निर्मितीची परंपरा शेकडो वर्षांपासूनची आहे. मिरज हे सितार निर्मितीच्या जागांपैकी महत्त्वाचं ठिकाण. मिरजच्या समृद्ध तंतुवाद्य परंपरेला आता पुन्हा एकदा मान्यता मिळालीय. ज्येष्ठ तंतुवाद्य निर्माते युसुफ घडूलाल मुल्ला यांना राज्य शासनाने उत्कृष्ट तंतुवाद्य निर्माते म्हणून सन्मानित केलंय. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा करतात मिरज संगीत विश्‍वात आनंदाची लहर पसरलीय. तीन लाख रुपये, मानपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे मिरजच्या तंतुवाद्य क्षेत्रात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेलाय.

युसुफ मुल्ला यांच्याविषयी....

युसुफ मुल्ला हे नाव तंतुवाद्य निर्मितीच्या जगतात एक वेगळी ओळख निर्माण करून गेले आहे. तब्बल साठ वर्षांहून अधिक काळ त्यांनी भारतीय पारंपरिक आणि अभिजात तंतुवाद्यांच्या निर्मितीला स्वतःला अर्पण केले आहे. सतार, सुरबहार, तंबूरा, दिलरुबा, इसराज, सरंगी आणि अनेक दुर्मिळ तंतुवाद्यांच्या सौष्ठवपूर्ण निर्मितीत त्यांचे कौशल्य अतुलनीय मानले जाते. आज तंतुवाद्य निर्मितीत परंपरागत कौशल्य जपणारे कारागीर मोजकेच उरले आहेत, आणि या मोजक्या उस्तादांमध्ये युसुफ मुल्ला यांचे स्थान अत्यंत मानाचे समजले जाते.

त्यांच्या हातून तयार झालेल्या वाद्यांनी देश-विदेशातील संगीतविश्वाला अक्षरशः मंत्रमुग्ध केले आहे. भारतातील प्रख्यात कलाकार, संगीत विद्यापीठे, संगीतसंस्था तसेच जगभरातील संगीतप्रेमींनी त्यांच्या वाद्यांना नेहमीच पसंती दिली आहे. त्यांच्या जीएस म्युझिकल्स या तंतुवाद्यनिर्मिती केंद्राने देश-विदेशात गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. विशेषतः अमेरिका, युरोप, मध्य पूर्व आणि आशियातील विविध देशांमध्ये त्यांच्या बनवलेल्या तंतुवाद्यांनी भारतीय संगीत परंपरेचा अनुनाद घुमवला आहे.

तंतुवाद्याच्या प्रत्येक तारेला स्वरांची प्राणप्रतिष्ठा देणारे युसुफ मुल्ला हे केवळ कारागीर नसून एक सांगीतिक परंपरेचा दुवा आहेत. भारतीय अभिजात संगीताचा आत्मा जपणाऱ्या या वाद्यनिर्मिती शिल्पकाराचा गौरव राज्य शासनाने करण्याचा निर्णय घेतला असून, तो संगीतविश्वासाठीही मोठा सन्मान आहे. या पुरस्कारामुळे मिरजच्या तंतुवाद्य परंपरेला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मानाचा तुरा प्राप्त झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget