Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना यांचं निधन; ज्युनियर एनटीआर, महेश बाबू अन् चिरंजीवींनी व्यक्त केला शोक
Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे.
Actress Jamuna Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री जमुना (Jamuna) यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जमुना यांच्या निधनानं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जमुना यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले होते.
1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या गरिकापती राजाराव यांच्या पुट्टील्लू चित्रपटामधून जमुना यांनी पदार्पण केले, तेव्हा त्या 15-16 वर्षांच्या होत्या. 1955 मध्ये एलव्ही प्रसाद यांच्या मिसम्मा चित्रपटात काम केल्यानंतर त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली. गुंडम्मा कथा, दोरिकिते डोंगलू, श्रीमंथुडू यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले.
अभिनेत्री जमुना यांनी 1965 मध्ये एसव्ही विद्यापीठातील प्राध्यापक जुलुरी रमण राव यांच्याशी लग्न केले. जमुना आणि जुलुरी रमण राव यांना मुलगा वामसी जुलुरी आणि मुलगी स्रावंती आहे.
जमुना यांच्या निधनानं साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ज्युनियर एनटीआर (Jr NTR), महेश बाबू (Mahesh Babu), चिरंजीवी (Chiranjeevi) या अभिनेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन जमुना यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महेश बाबूनं ट्वीट शेअर करुन जमुना यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'जमुना गुरु यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या भूमिका आणि इंडस्ट्रीतील तिच्या अतुलनीय योगदान यामुळे त्या कायम स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांबद्दल माझ्या संवेदना.'
Saddened to hear about the demise of #Jamuna garu. Will fondly remember her for all her iconic roles and her immense contribution to the industry. My condolences to her family and loved ones 🙏
— Mahesh Babu (@urstrulyMahesh) January 27, 2023
अभिनेता ज्युनियर एनटीआरनं देखील ट्वीट शेअर केलं आहे. त्यानं जमुना यांचा फोटो ट्विटरवर शेअर केला.
దాదాపు గా 30 సంవత్సరాలు తెలుగు సినిమా ఇండస్ట్రీ లో మహారాణి లా కొనసాగారు. గుండమ్మ కథ, మిస్సమ్మ లాంటి ఎన్నో మరుపురాని చిత్రాలు, మరెన్నో వైవిధ్యమైన పాత్రలతో మా మనసుల్లో చెరపలేని ముద్ర వేసారు.
— Jr NTR (@tarak9999) January 27, 2023
మీ ఆత్మకి శాంతి చేకూరాలని కోరుకుంటున్నాను. జమున గారి కుటుంబానికి నా ప్రగాఢ సానుభూతి. pic.twitter.com/ImmYbmBFl0
अभिनेते चिरंजीवी यांनी देखील ट्वीट केलं आहे.
సీనియర్ హీరోయిన్ జమున గారు స్వర్గస్తులయ్యారనే వార్త ఎంతో విచారకరం. ఆవిడ బహుభాషా నటి.మాతృభాష కన్నడం అయినా ఎన్నెన్నో విజయవంతమైన చిత్రాలతో తెలుగు వారి మనసుల్లో చెరగని ముద్ర వేశారు.మహానటి సావిత్రి గారితో ఆవిడ అనుబంధం ఎంతో గొప్పది.ఆవిడ కుటుంబానికి నా ప్రగాఢ సంతాపం తెలియచేసుకుంటున్నాను
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 27, 2023
Jamuna Garu 😢. One of most beautiful woman with a childlike heart, a legend in Telugu cinema. Will miss her dearly. 😔 pic.twitter.com/ux36MGdTxs
— Vishnu Manchu (@iVishnuManchu) January 27, 2023
महत्वाच्या इतर बातम्या :