एक्स्प्लोर

Ganeshostav 2024 : आजी आणि नातवाचं बाप्पासोबतचं खास नातं, वंदना गुप्तेंचं स्पेशल गाणं 

Ganeshostav 2024 : वंदना गुप्ते यांचं बाप्पा स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Ganeshostav 2024 :  गणेशोत्सव हा बाप्पाच्या गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. प्रत्येक वर्षी बाप्पाची नवीन गाणी येतच असतात. आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणाऱ्या अभिनेत्री  वंदना गुप्ते (Vandana Gupte) आणि आपल्या तरल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका उत्तरा केळकर या जोडीचा 'पार्वती नंदना' हा सोलो अल्बम ‘आदित्य नायर प्रोडक्शन्स’ च्या वतीने नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला गायिका उत्तरा केळकर, बालगायक आदित्य.जी. नायर यांचा स्वरसाज लाभला आहे.  प्रवीण कुंवर यांचे संगीत आहे. गुरु नायर प्रॉडक्शन्स या अल्बमचे निर्माते आहेत.   

कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो. हाच उत्साह आजी आणि नातवाच्या या गाण्यामधून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

'हे गाणं करताना या सगळ्याचं  समाधान जाणवलं'

वंदना गुप्ते यांनी या गाण्याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, पिढी मागोमाग पिढी बदलत जाते ,काळ पुढे सरकत जातो पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते. तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचं महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समाजवणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. हे गाणं करताना या सगळ्याचं  समाधान नक्कीच जाणवलं.  

कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यमुळे एक छान गाणं गायला मिळाल्याचा आनंद उत्तरा केळकर यांनी व्यक्त केला. चांगल्या  टीमसोबाबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आल्याचा आनंद व्यक्त करताना हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केला.                             

View this post on Instagram
 
A post shared by Aditya G Nair (@adityanairproduction)

ही बातमी वाचा : 

Anil Arora Death : मलायका 11 वर्षांची असताना आईवडिलांचा घटस्फोट, कोण होते अनिल अरोरा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Gold Rate : सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget