Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला'; 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त जाणून घ्या राणा दा अन् पाठकबाईंची रिअलवाली अरेंज कम प्यारवाली लव्हस्टोरी...
Akshaya Deodhar Hardeek Joshi : आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीची 'प्यारवाली लव्हस्टोरी' जाणून घ्या...
Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story : 'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी (Hardeek Joshi) गेल्या काही महिन्यांपूर्वी लग्नबंधनात अडकले आहे. पण अजूनही त्यांच्या लग्नाची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. आज 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine Day) निमित्त अक्षया आणि हार्दिकची 'प्यारवाली लव्हस्टोरी' (Akshaya Deodhar Hardeek Joshi Love Story) जाणून घ्या...
'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. जवळपास पाच वर्ष या मालिकेचं शूटिंग कोल्हापूरात सुरू होतं. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान अक्षया आणि हार्दिकची चांगली मैत्री झाली. पण त्यांनी त्यांचं नातं पुढे घेऊन जाण्याचा कधी विचार केला नाही.
अक्षय-हार्दिकच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली?
एका मुलाखतीत हार्दिक म्हणाला,"अक्षया आणि मी खूप चांगले मित्र होतो. पण मी तिला कधीच लग्नासाठी प्रपोज केलं नाही. पण माझी आई तिला सारखं म्हणायची की, मला तू आवडतेस. मलादेखील आई तिला लग्नासाठी विचारण्याचा सल्ला द्यायची. मी अक्षयासमोर लग्नाचा विषय काढला आणि तिने माझ्यासोबत बोलणं बंद केलं तर या विचाराने मी तिला कधीच काही विचारलं नाही. हा विषय मी खूप गांभीर्याने घेतला नाही".
हार्दिक पुढे म्हणाला,"आईच्या आग्रहाखातर एक दिवस अखेर मी अक्षयासोबत बोलयचं ठरवलं. मी तिला म्हणालो,'आपल्या दोघांचं लग्न व्हावं, अशी माझ्या आईची इच्छा आहे". त्यावर अक्षयाने लगेचच होकार दिला. ती म्हणाली,'मला काही अडचण नाही, तू एकदा माझ्या घरी येऊन आई-बाबांसोबत बोल". त्यानंतर अरेंज मॅरेजप्रमाणे हार्दिकने अक्षयाच्या घरी विचारलं. त्यानंतर थेट दहा महिन्यानंतर साखरपुड्याच्या तारखाच आल्या". हार्दिक-अक्षयाने अक्षय्य तृतीयेदिवशी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिवला.
'रिल टू रिअल'म्हणत अक्षया-हार्दिक लग्नबंधनात अडकले
View this post on Instagram
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी 2 डिसेंबर 2022 रोजी लग्नबंधनात अडकले. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
त्यांचा पारंपारिक विवाहसोहळा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. राणदा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाल्याने त्यांच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
संबंधित बातम्या