एक्स्प्लोर

'बॉलिवूडवाले मराठी कलाकारांना किंमत देत नाहीत, घाटी म्हणतात...'; वैभव मांगलेंनी सांगितलं धक्कादायक वास्तव

Vaibhav Mangale On Marathi Actors In Bollywood: बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी समजलं जातं. तिथे मराठी कलाकारांना कुणीही हिरो हिरोईन म्हणून घेत नाही, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Vaibhav Mangale On Marathi Actors In Bollywood: आपल्या सहजसुंदर अभिनयशैली, विनोदी भूमिकांमधील अचूक टायमिंग आणि विविधांगी भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे, वैभव मांगले (Vaibhav Mangale). त्यानं आजवर अनेक गाजलेल्या मराठी नाटकांमध्ये (Marathi Drama), मालिकांमध्ये (Marathi Serials) आणि सिनेमांमध्ये उल्लेखनिय भूमिका साकारल्या आहेत. कधी विनोदी, तर कधी गंभीर भूमिकांमधून वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं सर्वांनाच थक्क केलं. हा अभिनेता जेवढा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठीही चर्चेत असतो.  

सध्या वैभव मांगलेंची फेसबुक पोस्ट चर्चेत आहे. यामध्ये त्यानं हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल थेट आणि स्पष्ट भाष्य केलं आहे. बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी समजलं जातं. तिथे मराठी कलाकारांना कुणीही हिरो हिरोईन म्हणून घेत नाही, असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच, पुढे बोलताना मला कधी त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही किंवा तिथे काही केलं तरंच आपण भारी असं कधीही वाटलं नाही, असंही वैभव मांगले सांगायला विसरले नाहीत. 

अभिनेता वैभव मांगले नेमकं काय म्हणाला? (Vaibhav Mangale On Bollywood)

मराठमोळा अभिनेता वैभव मांगले म्हणाला की, "हे हे 'मराठी' कलाकार हिंदीत चमकणार, चमकले, चमकतील... हे फालतू कोडकौतुक पहिलं बंद केलं पाहिजे. तिथे चमकलं म्हणजे आपण भारी कलाकार का? बिनडोकपणा आहे. आम्ही इथे काम करतो, इथे आमच्यावर प्रेम करतात लोक आणि हिंदीत नाव कमावलं म्हणून कुणी मराठी रसिक हिंग लावून विचारतं नाही त्याला… बरं तिथेही कुणी हिरो, हिरोईन म्हणून घेत नाही. मराठी पार्श्वभूमी असलेल्या भूमिकाच देतात. माधुरी आणि नाना सोडले तर काही कुणी किंमत देत नाहीत तिथे... घाटी म्हणून संबोधतात..."

"एक आकस आहे, त्यांना आपल्या कलाकारांबद्दल... कधीही किंमत दिली नाही मराठी कलाकारांना... म्हणजे आमचं कमी अस्सल आणि ते अव्वल. फालतुगिरी... आमचे प्रशांत दामले, उमेश कामत, प्रिया बापट, भरत जाधव, मुक्ता बर्वे, निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, प्रसाद ओक, स्पृहा... खूप महत्वाचे आणि खूप खूप मोठे कलाकार आहेत... धन्यवाद. (आता काही महाभाग आपल्या कुणी काम दिलं नाही वाटतं म्हणून हे सुचतयं असं बोलतील... पण त्याना सांगून ठेवतो, मला कधी त्या इंडस्ट्रीनं भूरळ घातली नाही किंवा तिथे काही केलं तरंच आपण भारी असं कधीही वाटलं नाही)", असं वैभव मांगले म्हणाला. 

दरम्यान, वैभव मांगले विशेषतः मराठी विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो. त्यांनी 'टाईमपास', 'टाईमपास 2', 'बॉईज', 'पांडू' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच, अनेक लोकप्रिय मराठी मालिकांमधून आणि रंगभूमीवरील प्रयोगांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानामुळे ते मराठी प्रेक्षकांचे लाडके कलाकार म्हणून ओळखले जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Marathi Director Sanjay Jadhav On Depression: 'दुनियादारी'चा दिग्दर्शक संजय जाधव डाऊनफॉलमुळे डिप्रेशनमध्ये कसा गेला? दोनवेळा आयुष्य संपवण्याचा विचार मनात आला, सगळं सांगून टाकलं

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget