एक्स्प्लोर

Utkarsh Shinde Hundabali Song: 'नवऱ्यानं हुंड्यापायी जाळलं मला...', वैष्णवी हगवणेची व्यथा मांडणारं उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं प्रदर्शित

Utkarsh Shinde Hundabali Song: अभिनेता आणि गायक 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदे यानं वैष्णवीसारख्या अनेक विवाहितांची व्यथा गाण्यातून मांडली आहे. नुकतंच उत्कर्ष शिंदेचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

Utkarsh Shinde Hundabali Song After Vaishnavi Hagwane Death Case: पुण्यातील (Pune News) वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर (Vaishnavi Hagavane Death Case) अवघा महाराष्ट्र (Maharashtra News) हळहळला आणि त्यासोबतच संतापानं पेटून उठला. हुंड्यासाठी सासरच्यांनी वैष्णवीचा जाच केला. तिला मारहाण केली, तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून वैष्णनीनं गळफास लावून स्वतःला संपवलं. ही घटना समोर आल्यानंतर सारेच हादरले. आजच्या काळातही पुण्यासारख्या राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत एक 23 वर्षांची विवाहित महिला आणि 10 महिन्यांच्या बाळाची आई सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलते, हे पाहुन साऱ्यांचाच कंठ दाटला. याप्रकरणावर अनेकांनी आपला संताप व्यक्त करत वैष्णवीच्या सासरच्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. अशातच अभिनेता आणि गायक 'बिग बॉस मराठी' फेम उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) यानंदेखील वैष्णवीसारख्या अनेक विवाहितांची व्यथा गाण्यातून मांडली आहे. नुकतंच उत्कर्ष शिंदेचं हे गाणं प्रदर्शित झालं आहे. 

गायक उत्कर्ष शिंदेनं 'हुंडाबळी' हे गाणं विजय आनंद म्युझिक या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं. महत्त्वाची बाब म्हणजे, उत्कर्ष शिंदेनं हे गाणं 'बिग बॉस मराठी'च्या घरातही सादर केलं होतं. बिग बॉसच्या घरात गाणं सादर करतानाची व्हिडीओ क्लिप त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.   

View this post on Instagram
 
A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

उत्कर्ष शिंदेनं गायलेल्या गाण्याचे बोल आहेत, "दीराने ओढलं मला, नणंदेने पाडलं मला, सासूने झोडलं मला, कुणी ना सोडलं मला...शेवटी नवऱ्याने हुंड्यापायी जाळलं मला". उत्कर्ष शिंदेनं गायलेलं गाणं वैष्णवी हगवणेच्या घटनेशी अगदी मिळतं जुळतं आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी उत्कर्षच्या व्हिडीओवर केल्या आहेत. तसेच, उत्कर्षचं हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

वैष्णवी आत्महत्या करायच्या दिवसापर्यंत सुरू होता तिचा छळ 

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आतापर्यंत वैष्णवीची सासू, नणंद करिष्णा हगवणे, पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे आणि सासरे राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच, वैष्णवी आत्महत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचीही मागणी होत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलीय. वैष्णवीला आत्महत्येच्या दिवसापर्यंत सासरच्यांनी छळ केल्याचं समोर आलंय. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे 29 व्रण होते त्यापैखी 5 ते 6 व्रण ताजे असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलंय. वैष्णवीनं आत्महत्या करायच्या दिवसापर्यंत तिचा छळ करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. 

पाहा उत्कर्ष शिंदेचं 'हुंडाबळी' गाणं :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Embed widget