गुडघ्यांवर बसून मुस्लीम अभिनेत्री शंकराच्या मंदिरात पोहोचली, VIDEO तुफान व्हायरल
Urfi Javed Shiv Mandir Viral Video : गुडघ्यांवर बसून मुस्लीम अभिनेत्री शंकराच्या मंदिरात पोहोचली, VIDEO तुफान व्हायरल

Urfi Javed Shiv Mandir Viral Video : अतरंगी ड्रेस आणि निर्भीड भाष्य करण्यासाठी ओळखली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद गुडघ्यांवर बसून शंकराच्या मंदिरात (Shiv Mandir) दर्शनासाठी आली आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी उर्फीचं कौतुक केलंय, तर काहींनी तिला ट्रोल देखील केलंय.
उर्फी जावेदचा शंकराच्या मंदिरातील व्हिडीओ तुफान व्हायरल
उर्फी जावेदचा शंकराच्या मंदिरातील व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ मुंबईतील बबलूनाथ मंदिरातील आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद गुडघ्यावर बसून शिवमंदिर दर्शनासाठी जाताना दिसत आहे. यावेळी अभिनेत्री उर्फीने टी शर्ट आणि जीन्स असा पेहराव केलेला होता.
डोक्यावर स्कार्फ आणि तोंडावर मास्क घालून, उर्फी सतत पायऱ्या चढत आहे आणि मंदिरात जाण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. जणू काही त्याची एक इच्छा पूर्ण झाली आहे असे वाटते. ज्यामुळे ती अशा प्रकारे मंदिरात जात आहे.
उर्फी जावेदच्या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस
उर्फीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिले आहे की, 'प्रसिद्धीसाठी तुम्ही काहीही करू शकता.' तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, मुस्लिम असल्याबद्दल लाज वाटते. मात्र, काही लोक अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करतानाही दिसले. एक यूजर म्हणाला की उर्फीने आमचे मन जिंकले आहे. ही काही पहिलीच वेळ नाहीये, याआधीही उर्फीने अनेक शिवमंदिरांना भेट दिली आहे. उर्फी जावेद टेलिव्हिजन जगतातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने ओटीटीवरही पदार्पण केले आहे. पण ही अभिनेत्री तिच्या अभिनयापेक्षा तिच्या लूक्समुळे जास्त चर्चेत राहते.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या






















