एक्स्प्लोर

Faas : शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा चित्रपट, 'फास'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

Faas Marathi movie : धरतीच्या कुशीतून सोनं पिकवणारा शेतकरी गळ्याला का 'फास' लावून घेतो, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचं सांगणारा हा ट्रेलर आहे.

Faas Trailer : आपण जे करू शकलो नाही, ते मुलांना बनवायचं आणि त्यांना खूप मोठं बनवायचं ही स्वप्नं प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळत असली, तरी शेतकरी मात्र याला अपवाद आहे. आजही जिथे शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, आपल्या मुलांच्या मुलभूत गरजा भागवण्याची चिंता सतावते, तिथं त्यांच्या डोळ्यांत मोठं बनण्याची स्वप्नं कुठून येणार... याच वास्तवतेची जाणीव करून देणारा 'फास' (Faas) हा मराठी चित्रपट (Upcoming Marathi Movie) 4 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाचा मन हेलावून टाकणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, ग्रामीण भागासोबतच शहरातील प्रेक्षकांचाही या ट्रेलरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणाऱ्या 'फास'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला आकाशात वाऱ्याच्या वेगानं पळणारे ढग पहायला मिळतात. त्याला देण्यात आलेलं पार्श्वसंगीत मन हेलावून टाकतं. गावातील वस्ती, आत्महत्या करणारा जीव, मरण इतकं सोपं नसतं हे सांगणारा कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, शेतकऱ्याच्या व्यथा, नैसर्गिक संकटं, शपथेची आठवण करून देणारा संवाद, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नं, त्यांची जगण्यासाठीची धडपड आणि अखेरीस अशीच परिस्थिती राहिली तर गावची स्मशानं होतील ही चेतावणी देणारा संवाद 'फास'च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. धरतीच्या कुशीतून सोनं पिकवणारा शेतकरी गळ्याला का 'फास' लावून घेतो, याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आल्याचं सांगणारा हा ट्रेलर आहे.

पाहा ट्रेलर :

देश-विदेशातील अग्रगण्य सिनेमहोत्सवांमध्ये 'फास'चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. 'फास'ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं असून, दिग्दर्शनाच्या जोडीला अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनाचं कामही केलं आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमये या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. याखेरीज कमलेश सावंत शेतकऱ्याच्या, तर सयाजी शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत आहेत.

पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांची देखील त्यांना साथ लाभली आहे. डिओपी रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांचं आहे.

माँ एंटरटेनमेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित 'फास'ची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. अविनाश कोलते यांनी 'फास'चं दिग्दर्शन केलं आहे. 'फास'चा ट्रेलर रिलीज झाल्यावर लगेचच सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होऊ लागला आहे.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली

व्हिडीओ

Sanjay Raut On Mumbai Mayor : नगरसेवकांना लपवावं लागत असेल तर कायदा-व्यवस्था ढासललीय, एकनाथ शिंदेंना टोला
Girish Mahajan Majha Katta : सुधाकर बडगुजर प्रकरण ते नाशिकचं तपोवन, गिरीश महाजन 'माझा कट्टा'वर
PMC Election : पुण्याची 22 वर्षीय सई थोपटे सर्वात तरुण नगरसेवक Exclusive
BMC 22 years Corporator : BMC वॉर्ड नं 151 मधून 22 वर्षांची तरुणी झाली नगरसेवक! कसा होता प्रवास?
Uttar Pradesh Bijnor च्या मंदिरात कुत्र्याची अखंड प्रदक्षिणा,भटका श्वान की दैवी संकेत?Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
मोठी बातमी: शिंदे गटाचे नगरसेवक ठाकरेंच्या संपर्कात, मुंबईच्या राजकारणात उलथापालथ होणार?
Sunil Shelke: सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
सुनील शेळकेंना मोठा धक्का; राष्ट्रवादी उपाध्यक्ष भाजपात, झेडपी-पंचायत समिती निवडणुकांच्या डावपेचांना वेग
Maharashtra Elections Results 2026: एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
एका मतानं मैदान मारलं! परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा अवघ्या 1 मताने विजय, तर गडचिरोलीत भाजप उमेदवाराचा धक्कादायक पराभव
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
‘जब एक पति अपनी बायको की सुनता है…’; मीनल पाटील यांच्या विजयानंतर सांगावीतील बॅनर चर्चेत, 'पुष्पा'तील डायलॉगने चर्चा रंगली
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला; आता झेडपी, पंचायत समितीला शरद पवार गट तुतारीचा 'गळा' दाबून घड्याळाचे काटे फिरवणार!
Abdul Sattar: आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
आमदार अब्दुल सत्तारांना मतदारांवरील 'रामबाण उपाय' महागात पडणार? सत्तार, जिल्हाधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस!
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील अखेर शिंदे गटात दाखल; गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भूमिका निर्णायक ठरणार?
BMC Election Results 2026: बीएमसीतील सत्ता गेली पण ठाकरेंचा मुंबईतील पाया भक्कम, मराठी माणूस पाठीशी उभा राहिला
ठाकरे हरले पण संपले नाहीत, मुंबईच्या मराठी पट्ट्यातील जनतेकडून भरभरुन मतदान अन् 71 नगरसेवक विजय
Embed widget