एक्स्प्लोर

Upcoming Marathi Movie Tango Malhar: शास्त्रज्ञ, उद्योजिकेचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; प्रेरणादायी 'टँगो मल्हार'चं 19 सप्टेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शन

Upcoming Marathi Movie Tango Malhar: 'टँगो मल्हार' या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत.

Upcoming Marathi Movie Tango Malhar: चित्रपट माध्यमाची जादू काही औरच... कोणत्याही क्षेत्रात काम केलं, तरी स्वतः चित्रपट करण्याची उर्मी काहींना स्वस्थ बसू देत नाही. संगणक  शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी 'टँगो मल्हार' (Tango Malhar) या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं असून  येत्या 19 सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. 

'टँगो मल्हार' या चित्रपटाची निर्मिती ॲगलेट्स अँड आयलेट्स प्रॉडक्शन या निर्मिती संस्थे अंतर्गत करण्यात आली असून साया दाते या निर्मात्या आहेत. 'टँगो मल्हार' या चित्रपटात एका रिक्षा चालकाची गोष्ट उलगडण्यात आली आहे. काहीतरी नवीन करू पाहणाऱ्या तरुण अशा मल्हारला अचानकपणे 'टँगो' या अर्जेटिनाच्या नृत्य प्रकाराचा शोध लागतो आणि त्याची आवड निर्माण होते. या नृत्य प्रकारामुळे त्याच्या आयुष्यात काय काय गोष्टी रंजकपणे घडत जातात,  या कथासूत्रावर 'टँगो मल्हार' हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटाचं लेखन साया दाते, मनीष धर्मानी यांनी केलं आहे. 

सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनी आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत केलं आहे. चित्रपटात नितेश  कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड,  मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे या नवोदित कलाकरांचा  अभिनय आपल्याला पहायला मिळणार आहे.

साया दाते यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित 'मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (एमआयटी) येथून  मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी दहा वर्षं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करताना अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत युट्यूबमध्ये काम केलं, त्यानंतर भारतात परत येऊन पुण्यात स्वतःची कंपनी उभी केली. उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रतिष्ठित फोर्ब्जच्या '30 अंडर 30' या यादीत त्यांना स्थान मिळालं होतं. 

साया यांच्यात चित्रपट प्रेमाचं बीजं बालपणीच पेरलं गेलं होतं. वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी 'ऑन द अदर लाइन' ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली होती. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा ही शॉर्टफिल्म गौरवली गेली. त्याशिवाय त्या स्वतः टँगो डान्सरही आहेत. त्यामुळे एकीकडे तंत्रज्ञान, उद्योगात उत्तम काम करत असताना कलेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे आपली आवड जपण्यासाठी त्यांनी 'टँगो मल्हार' चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले आहे. त्यामुळे एका  संगणक शास्त्रज्ञ, उद्योजिकेचा मराठी चित्रपट निर्मिती, दिग्दर्शनाचा प्रयत्न नक्कीच उत्सुकता वाढवणारा आहे यात शंका नाही.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारच मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती
IND vs SL 2nd Test : कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव OUT, एका खेळाडूचं पदार्पण; श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अशी असेल टीम इंडियाची Playing XI
Embed widget