एक्स्प्लोर

ऑगस्टमध्ये अल्ट्रा झकास ओटीटीवर थ्रिलर 'झकास फ्रायडेस'; हॉलिवूडचे मराठीत डब चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

August OTT Release : ऑगस्ट महिन्यामध्ये अल्ट्रा झकास ओटीटीवर मराठीत डब केलेले सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

August OTT Release :  ऑगस्ट महिन्यात, अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर (Ultra Media Buzz) थ्रिल आणि ॲक्शनचे चित्रपट येत आहेत, जे तुम्ही तुमच्या मित्र परिवार आणि कुटुंबासोबत पाहू शकता. साऊथचा समारा पासून ते हॉलीवुडचा लाय बाओ पर्यंत, प्रत्येक शुक्रवारी नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर पाहूया ऑगस्टमध्ये कोणते पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

Samara

‘सामारा’ मल्याळम चित्रपट लवकरच मराठीत 02 ऑगस्ट 2024 रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक चार्ल्स जोसेफ आहे. ही कथा अँथनी नावाच्या  पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते, जो एका बर्फाळ भागात रहस्यमय विषाणूचा प्रादुर्भाव तपासत आहे.

डाक

‘डाक’ हा एक भयपट आणि सस्पेन्स थ्रिलर आहे ज्याचे दिग्दर्शन आणि लेखक महेश नेने यांनी केले आहे. चित्रपटात अश्विनी काळसेकर, अनिकेत केळकर आणि संजीवनी जाधव यांच्या अप्रतिम भूमिका आहेत. हा चित्रपट 09 ऑगस्ट 2024 रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. गावात राहणारा गोपाळ आत्महत्या करतो. गोपाळच्या मृत्यू संदर्भात तपास सुरू करण्यासाठी गावात काही अधिकारी पोहोचतात. गोपाळने खरंच आत्महत्या केली कि त्याची आत्महत्या घडवून आणली? याचा शोध या सिनेमातून घेण्यात येणार आहे. 

Flesh Wound’s हॉलीवूडचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘फ्लेश वूंड’ म्हणजेच (जखम) 16 ऑगस्ट 2024 रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर मराठीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॅन गार्सिया असून चित्रपटाची कथा एलिट ऑप्स टीम एल.टी. टायलरच्या नेतृत्वाखाली आहे. एल.टी. टायलर आणि त्यांच्या टीमला चोवीस तासांच्या आत बेपत्ता झालेल्या शास्त्रज्ञांच्या गटाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे जे टॉप-सिक्रेट मिशनवर काम करत असतात. 

Chase

 आता प्रेक्षकांना कन्नडचा 'चेज' या चित्रपटाचा आनंद मराठीत घेता येईल जो 23 ऑगस्ट 2024 रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. नेत्रहीन माजी पोलीस अधिकारी निधीला एका अनोळखी माणसाची मदत घेऊन घरी जात असताना एका अपाघातमुळे तिला चांगलाच धक्का बसतो. जेव्हा ती पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी जाते तेव्हा सीसीबी अधिकारी अविनाश या प्रकरणाची जबाबदारी घेतात. ही केस निधी आणि अधिकारी, दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारे अनपेक्षित वळण घेऊन येते.

लाय बाओ

हॉलीवुड चित्रपट ‘लाय बाओ’ प्रेक्षकांच्या भेटीला 30 ऑगस्ट 2024 रोजी अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे. ही कथा टॅम या कॉमिक कलाकाराची आहे, ज्याला कळते की त्याला एक गंभीर आजार आहे. जगण्याच्या हताशपणात, टॅम प्रायोगिक वैद्यकीय उपचार करण्याचा प्रयत्न करण्यास सहमत होतो आणि उपचारानंतर, त्याला अलौकिक शक्ती प्राप्त होतात. परंतु उपचाराची उत्पत्ती एका गडद इतिहासात गुंफलेली आहे जी त्याच्या आयुष्यात उलगडली जाते.

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi : 'आलिया भोगासी असावे सादर', वर्षा उसगांवकर-निक्कीच्या वादावर बिग बॉसच्या माजी स्पर्धकाचे फक्त चारच शब्द

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 19 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सVidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया कशी असेल?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Election : संभाजीनगरात व्होटर आयडी जमा करून 1500 रूपये देण्याचा प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Vidhan Sabha Election 2024: शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
शरद पवार गटाच्या रमेश कदमांना धमकी, 'बाबा सिद्दीकीप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव'; पोलिसांत तक्रार दाखल
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Phalodi Satta Bazar Maharashtra Vidhan Sabha: राज्यात कोणाची सत्ता येणार, महायुती की मविआ? फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठी बातमी, फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज काय?
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Embed widget