Udit Narayan Viral Video : गाणी म्हणत उदित नारायण यांच्याकडून पुन्हा चिटकण्याचा प्रयत्न, हुशार अभिनेत्रीने जागेवर कलटी मारली Video
Udit Narayan Viral Video : गाणी म्हणत उदित नारायण यांच्याकडून पुन्हा चिटकण्याचा प्रयत्न, हुशार अभिनेत्रीने जागेवर कलटी मारली Video

Udit Narayan Viral Video : नव्वदीच्या दशकातील गाण्यांची क्रेझ आज देखील कायम आहे. अलका यागनिक-उदित नारायण-कुमार सानू यांच्या आवाजाने नव्वदीच्या दशकात आणि त्यानंतर अनेक सिनेमे गाजलेले पाहायला मिळाले. आजही त्यांचे अनेक गाणे नव्या पॅटर्नमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. दरम्यान, ज्येष्ठ गायक उदित नारायण (Udit Narayan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवासांपूर्वी एका शो मध्ये गाणी गात असताना उदित नारायण यांनी अनेक महिलांना किस केलं होतं. त्यानंतर उदित नारायण (Udit Narayan Viral Video) ट्रोल देखील झाले होते. दरम्यान, आता उदित नारायण यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय.
View this post on Instagram
उदित नारायण यांचा अभिनेत्री भाग्यश्री सोबतचा व्हिडीओ व्हायरल
नव्याने व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री भाग्यश्री (actress Bhagyashree) आणि उदित नारायण दिसत आहेत. मैने प्यार किया या सिनेमातील एका गाण्यावर दोघांनी नॉरमल डान्स आणि हावभाव दाखवत डान्स करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, उदित नारायण या व्हिडीओत देखील अभिनेत्रीला चिटकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, अभिनेत्री भाग्यश्री हिने हुशारी दाखवत तेथून पळ काढलाय.
View this post on Instagram
अभिनेत्री भाग्यश्रीने हुशारी दाखवत कलटी मारली
भाग्यश्री उदित नारायणसोबत गाताना एका नॉस्टॅल्जिक क्षणाचा आनंद लुटताना दिसत आहे. मात्र, उदित नारायण जसा जसा जवळ येण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात येताच भाग्यश्रीने चलाखी दाखवली आहे. भाग्यश्री तिथून जागेवर कलटी मारुन निघून गेलीये. दरम्यान, भाग्यश्रीच्या या हुशारीची सोशल मीडियावर चर्चा रंगू लागलीये. नेटकरी तिचं या व्हिडीओमुळे कौतुक करताना दिसत आहेत. मात्र, दुसरीकडे नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरुवात केलीये.
उदित नारायण यांचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते कार्यक्रमात गात असताना अनेक महिलांना किस करत होते. त्यांनी काही महिलांना किस केले. तर एका सिक्युरिटी गार्डनेही तिथून कलटी मारली होती. त्यानंतर सोशल मीडियावर उदित नारायण चांगलेच ट्रोल झाले होते.
उदित नारायण व्हायरल झालेल्या या व्हिडीओबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “मी बॉलीवूडमध्ये 46 वर्षांपासून आहे, आणि माझी प्रतिमा अशी कधीच नव्हती की मी जबरदस्तीने चाहत्यांचे चुंबन घेतो. खरं तर, माझ्या चाहत्यांनी माझ्यावर केलेले प्रेम पाहून मी कृतज्ञतेने हात जोडतो. स्टेजवर असताना, हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही, असा विचार करून मी नतमस्तक होतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या























