एक्स्प्लोर

सुट्टीत आजोळी गेली; चुलत भावानं केला घाणेरडा प्रकार, प्रेग्नंसीच्या भितीनं पपई खायला लागली ; TV अभिनेत्रीचा शॉकिंग खुलासा

Tv Actress: कनिकाचा जन्म हरियाणातल्या पानिपत येथे झाला. तिला अभिनयाची ओढ सुरुवातीपासूनच होती. 2016 मध्ये बढो बहु या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

Kanika Maan Harrasment: हिंदी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री कनिका मान (Kanika Maan) सध्या चर्चेत आली आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्यासोबत झालेल्या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजोळी गेल्यानंतर नात्यातीलच एका भावाने शारीरिक शोषण केल्याचा खळबळजनक खुलासा तिने केलाय. या घटनेमुळे ती इतकी घाबरलेली की आपण गरोदर होऊ अशी भीती तिला वाटलेली असंही तिनं सांगितलं. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं हा खुलासा केलाय. 

आजोळी सुट्टीला गेली, चुलत भावानेच ..

अभिनेत्री कनिका मान हिने तिच्या लहानपणी घडलेल्या एका धक्कादायक प्रसंगाविषयी खुलासा केला. तिने सांगितलं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळं कुटुंब एकत्र जमायचं, तेव्हा तिच्या एका चुलत भावाने तिच्याशी गैरवर्तन केलं होतं. .त्यावेळी मला नक्की काय घडतय हे समजणे इतकं माझं वयच नव्हतं.पण काहीतरी चुकीचं घडल्याचे जाणीव मला सतत होत होती असं तिने सांगितलं. अनेक वर्ष हा कटू अनुभव तिने दाबून ठेवलेला. कनिकानं सांगितलं," लहान मुलांसाठी अशा गोष्टी सांगणं फार कठीण असतं.त्यांना वाटत असत आपल्याला कोणी समजून घेईल का ? आपल्याला ओरडा पडेल या भीतीने अनेक मूल गप्प राहतात. माझ्या बाबतीतही तेच घडलं होतं. " कनिकाच्या खुलाशाने मोठी खळबळ उडाली आहे.प्रकाराने माझ्या मनात भीती बसली होती.  अशा घटनांमुळे मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. 

गरोदरपणाच्या भीतीनं पपई खायला लागले..

कनिकानं सांगितलं ' मी भीतीपोटी खूप पपई खायला लागले. मी घरी माझ्या बहिणीकडून किंवा मावशीकडून ऐकले होते की, गरोदरपणात पपई खाऊ नये नाहीतर गर्भपात होऊ शकतो. मला गरोदर असल्याची भीती वाटत होती.त्यामुळेच मी पपई खायला सुरुवात केली. " असं कनिकाने सांगितलं .

ती म्हणाली मी त्यावेळी माझ्या आई वडिलांनाही सांगितलं नव्हते. कारण तुम्हाला भीती वाटते अपराधी वाटतं आपण काहीतरी चुकीचं केलं आहे का असा विचार मनात येतो. त्यावेळी माझ्या मनात हेच विचार आले होते. त्यामुळे खूप नंतर मी ही गोष्ट आई-वडिलांना सांगितली " असं ती म्हणाली.

कनिकाचा जन्म हरियाणातल्या पानिपत येथे झाला. तिला अभिनयाची ओढ सुरुवातीपासूनच होती. 2016 मध्ये बढो बहु या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.त्यानंतर झी टीव्हीवरील गुड्डन 'तुमसे ना हो पयेगा' या मालिकेत ती दिसली. नंतर खतरों के खिलाडी 12 मध्ये तिनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची पसंती मिळवली. 'नागिन 7 ' मालिकेतून ती सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे .

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Live blog updates: लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी देशवासियांना थोड्याचवेळात संबोधित करणार
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Embed widget