एक्स्प्लोर

गाझातल्या हिंसाचारावर बर्लिनमध्ये सिनेमॅटिक रणकंदन; कुटुंब गमावलेल्या 6 वर्षीय हिंद 'रिजाब'ची गोष्ट

टुनिशियाची दिग्दर्शिका कॉथर बेन हानिया हिनं प्रतिष्ठेचा ‘सिनेमा फॉर पीस अवार्ड’ नाकारला आहे. मिळालेली ट्रॉफी व्यासपीठावर ठेवून त्या निघून गेल्या.

टुनिशियाची दिग्दर्शिका कॉथर बेन हानिया हिनं प्रतिष्ठेचा ‘सिनेमा फॉर पीस अवार्ड’ नाकारला आहे. मिळालेली ट्रॉफी व्यासपीठावर ठेवून त्या निघून गेल्या. त्यापुर्वी केलेल्या भाषणात त्यांनी जर्मनीच्या इस्राइल संदर्भातल्या दुटप्पी धोरणाची पिसं काढली. हा पुरस्कार सोहळा जर्मनीची राजधानी बर्लिन शहरात होतो. मानवी हक्कांची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाला हा जागतिक स्तरावरचा पुरस्कार देण्यात येतो. 

शांतता म्हणजे अत्तर नाही जे हिंसाचारावर फवारलं आणि सुगंधित वातावरण तयार झालं. जर आपण शांततेबद्दल बोलणार असू तर आपण न्यायाबद्दल बोलायला हवं. न्याय म्हणजे जबाबदारी घेणं. त्यांच्या शांतीसंदर्भातल्या मिळमिळीत भाषणाला विरोध म्हणून हा पुरस्कार नाकारतेय. जेव्हा शांततेच्या नावाखाली खरा न्याय होईल आणि इस्राइलमधल्या गाझापट्टीच्या हिंसाचाराच्या नैतिक जबाबदारीवर ते बोलतील तेव्हा मी हा पुरस्कार घ्यायला नक्कीच येईल.” असं दिग्दर्शिका कॉथर बेन हानियानं ठणकावून सांगितलं आणि स्टेज सोडला. 

कॉथर बेन हानियाचा द वॉईस ऑफ हिंद रिजाब (2025)  हा सिनेमा जगभरात प्रचंड गाजलाय. इस्रायलनं केलेल्या ड्रोन हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पुर्ण कुटुंब गमावलेलेया 6 वर्षीय हिंद रिजाबची ही गोष्ट जगाला रडवतेय. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याला विशेष पुरस्कार मिळाला.  टुनिशियातर्फे ऑस्कर्समध्ये ती बेस्ट इंटरनॅशनल फिल्म या कॅटेगरीत स्पर्धा ही करत आहे.

दुसरीकडे सध्या सुरु असलेल्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही इस्राइल संदर्भात वादंग सुरु झालाय. मानवी हक्कांचा लढा दुटप्पी असू शकतो का? असा सवाल बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचे आयोजक असलेल्या जर्मनीला करण्यात येतोय. युक्रेन-रशिया आणि इराण-अमेरिका युध्दावर मानवी हक्कांचा झेंडा फडकवणारा जर्मनी पॅलेस्टाईन-इस्राइल युध्दावर गप्प का? गाझात इस्राइल सैन्यानं हत्याकांड घडवलं त्यावर काहीही न बोलणं संयुक्तिक आहे का? असा सवाल जगभरातल्या 80 हून अधिक कलाकारांनी बर्लिन फेस्टिव्हलला केलाय. त्यांनी पत्र लिहून जर्मनी विरोधात आपला निषेध नोंदवला आहे. हावेर बारदेन (स्पेन), टिल्डा स्विन्टन (ब्राझिल) या सारख्या ऑस्कर पुरस्कार विजेत्या कलाकारांनी
या पत्रावर सह्या केल्या आहेत.

यंदा 12 ते 22 फेब्रुवारी 2026 असा बर्लिनाले - अर्थात बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरु आहे. हा जगातला प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हल मानला जातो. जर्मन सरकार त्याचं आयोजन करतं. यंदा बर्लिनालेचं 76 वर्ष आहे. यंदा बर्लिनालेच्या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स प्रचंड वादग्रस्त ठरली. या ज्युरी पॅनेलचे अध्यक्ष जर्मनीचे प्रसिद्ध दिग्दर्शक विम वेंडर्स आहेत. शिवाय मीन बहादुर बाम (नेपाल) बे डुना (दक्षिण कोरिया) शिवेंद्रसिंह डुंगरपुर (भारत) रेनाल्डो मार्क्सस ग्रीन (अमेरिका) हिवाळी (जपान ) एवा पुशचीनस्का (पोलंड) असं तडगं ज्युरी पॅनल आहे. प्रथेप्रमाणे बर्लिनाले सुरु होण्यापुर्वी ज्युंरीची प्रेस कॉन्फरेन्स झाली. त्यात पत्रकारांनी राजकिय प्रश्नांनींच सुरुवात केली.

पत्रकार -
जगात सर्वत्र युध्दाचं वातावरण असताना सिनेमामुळं जग बदलू शकतं का?

विम वेंडर्स -
होय,  सिनेमानं जग बदलू शकतं. राजकियदृष्ट्या नाही. कुठल्याही सिनेमानं कुठल्याही राजकारण्याची विचारसारणी बदलेली नाही. पण लोकांनी कसं जगावं हे सिनेमातून सांगता येऊ शकतं. सामान्य लोकांचं जगणं आणि सरकारांची वर्तणूक याच्यात प्रचंड विसंगती आहे. सिनेमा या विसंगतीवर नक्कीच भाष्य करतं.

पत्रकार -
सध्याच्या अस्वस्थ वातावरणात सिनेमानं कसा बदल घडू शकेल?

विम वेंडर्स -
सिनेमा आणि साहित्य दुसऱ्यांच्या दृष्टीकोनातून जगाकडे बघण्याची संधी देतं. आणि अनेकदा त्यामुळं प्रेक्षकांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होते. होय सिनेमामुळं बदल होऊ शकतो असं माझं मत आहे.

न्यूज मधून प्रेक्षकाला काहीही मिळत नाही. पण जेव्हा आपण सिनेमा पाहतो तेव्हा त्यातल्या पात्रांच्या संघर्षाशी आपण कनेक्ट होतो. त्याच्याशी कनेक्ट होतो. सिनेमात प्रेक्षकांमध्ये कनवाळू आणि सहानुभूतीची भावना तयार करण्याची ताकद आहे. न्यूज मध्ये ही सहानुभूती नसते, राजकारणात ती सहानुभूती नसते. पण ते सिनेमाकडे आहे. आणि ही आमची ड्युटी आहे.

पत्रकार -
या जगात काहीच अवकाशात घडत नाही. बर्लिनालेने इराण आणि युक्रेनमध्ये घडणाऱ्या युध्दाबद्दल आवाज उठवलाय. पण पॅलेस्टाईनमध्ये जे घडतं त्यावर थेट भाष्य केलेलं नाही. याचा अर्थ असा काढता येईल की जर्मन सरकार गाझातल्या हत्याकांडाला समर्थन करतंय. तेच जर्मन सरकार बर्लिन फिल्म फेस्टिव्हलचे मुख्य प्रायोजक आहेत. मानवी हक्कांच्या पायमल्लीकडे आपल्या सोयीनुसार पाहण्याबद्दल या फेस्टिव्हलचा ज्युरी म्हणून आपल्याला काय वाटतं?

उत्तर - एवा पुशचीनस्का -

आधी सहानुभूती तयार करणं हे सिनेमाचं काम आहे. परिस्थिती समजावून घेणं आणि आपला दृष्टीकोन बदलणं हे सिनेमाचं काम आहे. हा प्रश्न आम्हाला विचारणं थोडसं असंयुक्तिक असेल. आम्ही जग बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलं. त्या प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आम्ही दिलाय. जर्मनीनं पॅलेस्टाईनला सपोर्ट करावा की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही. जगात इतर ठिकाणीही युध्द सुरु आपल्याला सर्वच विचार करावा लागेल. हा खुप क्लिष्ट प्रश्न आहे. आणि आम्ही सपोर्ट करतोय की नाही, आमच्या सरकारांशी बोलतोय की नाही हे आम्हाला विचारणं थोडसं योग्य होणार नाही. मी एक नागरीक म्हणून निवडणूक प्रक्रियेत भाग घेते. मी माझ्या देशात होणाऱ्या आंदोलनात भाग घेते जे माझ्या दृष्टीनं योग्य असतं. पण आम्ही इथं वेगळं काम करायला आलोय. त्यामुळं आम्हाला हा प्रश्न विचारणं आणि आमच्याकडून सर्वसमावेशक उत्तर घेणं हे योग्य होणार नाही. त्याबद्दल आम्हाला माफ करा.

उत्तर - विम वेंडर्स -

आम्ही राजकारणात शिरु शकत नाही. आम्हाला राजकारणाबाहेर राहावं लागेल, कारण आम्ही जर फक्त राजकारणाबद्दल सिनेेमे बनवले तर आम्ही राजकारणात प्रवेश करतोय. आम्ही संतुलन राखण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला लोकांचं, लोकांसाठीचं काम करावं लागेल.

या प्रश्नांच्या उत्तरांवर वातावरण तापलं. प्रसिध्द लेखिका अरुंधती राय यांनी बर्लिनालेतून माघार घेत असल्याचं घोषित केलं. जे कलाकार ज्युरी आहेत पण ते राजकिय भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांना कलाकार म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला. यालाच आता जगभरातल्या १०० हून अधिक कलाकारांनी पाठींबा दिलाय.

बर्लिन फिल्म फेस्टिव्हलनं मात्रं आपल्या ज्युरींची बाजू लावून धरलेय. प्रत्येक कलाकाराला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. असं बर्लिनालेनं आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटलं आहे. 

युध्दावरुन एखादा देशाच्या भूमिका न घेण्यावरुन अलिकडच्या काळात गाजलेलं हे एकमेव प्रकरण असावं. यामुळं जर्मनी सैधांतिक आणि नैतिक अडचणीत सापडला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget