एक्स्प्लोर

अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...

शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे

शिर्डी: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीत महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपच्या वाट्याला गेला, शिवसेनेकडून यासाठी प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, जागावाटपात ही जागा भाजपला (BJP) सुटली असून भाजपने सुहास शिरसाट (Suhas Shirsat) यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे पुत्र समीर सत्तार (Sameer Sattar) यांनी अपक्ष  उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर, स्वतः अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांनी भाजपवर अत्यंत खळबळजनक आरोप करत टीका केली. त्यामुळे, महायुतीमधील शिवसेना-भाजपाचा अंतर्गत युद्ध चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे, अब्दुल सत्तार यांनी दोन्ही शिवसेनेनं एकत्र यायला हवं, असेही म्हटले होते. त्यावर, आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी प्रतिक्रिया दिलीय. 

शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. त्यावर, आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर का गेलात? आज तुम्ही आणि तुमचे नेते भाजप बरोबर घरगडी म्हणून काम करत आहात. ही भूमिका का स्वीकारली, त्यावर आधी भाष्य करा आणि तुमच्या नेत्यांना सांगा, असे संजय राऊत यांनी म्हटले. भाजपबरोबर जाणं म्हणजे महाराष्ट्राशी बेईमानी, महाराष्ट्राला खड्डयात घालणं आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या नेतृत्वावाला सांगावं, त्यावर जाहीरपणे भूमिका व्यक्त केली पाहिजे अशा शब्दात संजय राऊत यांनी अब्दुल सत्तार यांच्या भूमिकेवरुन प्रतिक्रिया दिली. 

शिवसेना एकच आहे, हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली आणि त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत ती अमित शहांची शिवसेना आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. निवडणूक आयोग हाताशी धरून कटकारस्थान करून अमित शाहांनी तात्पुरती कंपनी निर्माण केलीय. ज्यांना कृत्याचा पश्चाताप झाला असेल त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेशी चर्चा करावी, असे आवाहन देखील त्यांनी केलंय. 

अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

"शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच करत आहे. आमचा त्याग गुवाहाटीतील कामाख्या देवीला (Kamakhya Temple) माहिती आहे, पण भाजप तो त्याग आता पूर्णपणे विसरली आहे. भाजप आमच्या पक्षात गटतट पाडत आहे. त्यांनी आमचे हातपाय आधीच तोडले होते, आता थेट मुंडकंच तोडून टाकलं आहे." अशा शब्दात अब्दुल सत्तार यांनी भाजपवर टीका केली. तसेच, "आमची जिल्हा परिषद गेली, महापालिकेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांच्या काळापासून असणारी सत्ताही संपली, आता आमच्याकडे राहिलं काय? अनेक छोट्या जागांवर वैयक्तिक भाजपचे नेते मोठे होत आहेत आणि शिवसेनेला संपवले जात आहे." असेही सत्तार यांनी म्हटले.  

दरम्यान, दोन्ही शिवसेना एकत्र यायल्या हव्यात असे मत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  अंबादास दानवे काय म्हणाले ते मी ऐकलं नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावरही संजय राऊतांनी भूमिका मांडली.

हेही वाचा

नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget