एक्स्प्लोर

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 4: 'राजा शिवाजी', 'देऊळ बंद 2'नंतर मराठी सिनेसृष्टीत आणखी एक सुपरहिट फिल्म; हॉरर-कॉमेडीचा जादूई फॉर्म्युला हिट, 4 दिवसांत वसूल केलं 66% बजेट

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 4: सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत आपल्या बजेटपैकी 60 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे.

Tumbadchi Manjula Box Office Collection Day 4: मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) सध्या बॉक्स ऑफिस (Tumbadchi Manjula Box Office Collection) गाजवतेय. गेल्या काही महिन्यांत आलेल्या सिनेमांनी बॉलिवूड (Bollywood News) सिनेमांना मागे टाकून धुवांधार कमाई केल्याचं पाहायला मिळालंय.  आधी 'राजा शिवाजी' (Raja Shivaji), त्यानंतर 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) आणि आता 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. हे आम्ही नाहीतर, या सिनेमांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन सांगतंय. सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं रिलीज झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांत आपल्या बजेटपैकी 60 टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल केली आहे.

'तुंबाडची मंजुळा'ची चौथ्या दिवशी दमदार कमाई (Tumbadchi Manjula BO Collection)

कोइमोईच्या रिपोर्टनुसार, सिनेमानं चौथ्या दिवशी सुमारे 70 लाख रुपयांची कमाई केली. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाच्या तुलनेत ही कमाई तब्बल 29.62 टक्क्यांनी अधिक आहे. सिनेमानं पहिल्या दिवशी 54 लाख रुपयांचा गल्ला जमवला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाला 391 शो मिळालेले. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रविवारी शोची संख्या 500 पर्यंत वाढवण्यात आली. तर सोमवारी ही संख्या 600 वर पोहोचली.

4 दिवसांत जमवला 4 कोटींचा टप्पा

'तुंबाडची मंजुळा' सिनेमानं आतापर्यंत एकूण 3.95 कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं असून ग्रॉस कमाई 4.66 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. पहिल्या आठवड्याअखेरीस हा सिनेमा 5.5 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्या अभिनयासोबतच सिनेमाच्या कथानकाला मिळालेली पसंती ही या यशामागची प्रमुख कारणं मानली जातेय.

'तुंबाडची मंजुळा'चं  डे-वाइज कलेक्शन (Tumbadchi Manjula Day Wise Collection)

पहिला दिवस   54 लाख
दुसरा दिवस    98 लाख
तिसरा दिवस  1.73 कोटी
चौथा दिवस  70 लाख

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तुंबाडची मंजुळा' सिनेमा सुमारे 6 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. अवघ्या चार दिवसांत सिनेमानं 3.95 कोटी रुपयांची कमाई करत तब्बल 65.83 टक्के खर्च वसूल केलाय. हॉरर-कॉमेडी प्रकारातील सिनेमाचं दिग्दर्शन विविध कोरगावकर यांनी केलंय. सिनेमात सई ताम्हणकर आणि जितेंद्र जोशी यांच्यासह ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उमेश जगताप यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा आणि त्यातील विनोद-रहस्याचा मिलाफ प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरतोय.

2026 मधील टॉप 5 मराठी सिनेमांमध्ये स्थान (Top 5 Marathi Movies Of 2026)

'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद 2'नंतर 2026 मधील आणखी एक यशस्वी मराठी सिनेमा म्हणून 'तुंबाडची मंजुळा'कडे पाहिलं जातंय. विशेष म्हणजे, या सिनेमानं यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 5 मराठी सिनेमांच्या यादीतही स्थान मिळवलंय. यासाठी त्यानं 'सुपर डुपर' सिनेमाला मागे टाकलंय. 'सुपर डुपर'नं 3.44 कोटी रुपयांची कमाई केली होती आणि तो या यादीत पाचव्या क्रमांकावर होता.

दरम्यान, 'तुंबाडची मंजुळा' सिनेमाला मिळत असलेला सकारात्मक प्रतिसाद आणि वाढती प्रेक्षकसंख्या पाहता, येत्या काही दिवसांत 'तुंबाडची मंजुळा' बक्कळ कलेक्शन करणार असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shashank Ketkar On Live In Relationship: 'विषय खूप अवघड, लग्न करूनही, लिव्ह-इनमध्ये राहणारी माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये...'; शशांक केतकरचा भुवया उंचावणारा खुलासा

ABP Majha च्या बातम्या LIVE: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
हिंदू मुली मुस्लिमांच्या संपर्कात आल्या की कट्टर डाव्या होतात... कंगना रनौतचा video व्हायरल; नेमकं काय म्हणाली?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget