4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये इतकी मॉर्डन 'शूर्पणखा'! ट्रोलिंगदरम्यान रकुल प्रीत सिंहचं उत्तर; म्हणाली..
रावणाची बहीण शूर्पणखा हे रामायणातील महत्त्वाचे पण नकारात्मक पात्र मानले जाते.

Ramayan Shurpanakha Rakul Preet Singh: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची चर्चा रंगली आहे. विशेषतः शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणाऱ्या रकुल प्रीत सिंहने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ट्रेलरमधील ओठांवर लावलेल्या लिपस्टीकपासून ते कपड्यांपर्यंत नेटकऱ्यांनी रकूलच्या भूमिकेला ट्रोल केल्यामुळेही चर्चा रंगली आहे. हे ट्रोलिंग सुरू असताना या भूमिकेसाठी होकार का दिला, याबाबत अभिनेत्रीने स्वतः खुलासा केला आहे.
रावणाची बहीण शूर्पणखा हे रामायणातील महत्त्वाचे पण नकारात्मक पात्र मानले जाते. मात्र, या भूमिकेतील गुंतागुंत आणि तिच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंनी आपल्याला आकर्षित केल्याचं रकुल म्हणालीय.
रकुल प्रीत सिंहने काय म्हटलं?
एका चाहत्याने एक्स (X) वर लिहिलेल्या भावनिक पत्राला उत्तर देताना रकुल प्रीत सिंह म्हणाली, "या सुंदर पत्रासाठी धन्यवाद. मी 'शूर्पणखा'ची भूमिका स्वीकारली कारण तुम्ही उल्लेख केलेला तिचा गुंतागुंतीचा स्वभाव मला खूप भावला. इतिहासात तिची आठवण अनेकदा एका प्रसंगापुरतीच मर्यादित राहते, पण तिच्या कथेत त्यापेक्षा बरेच काही आहे."
Thank you for this beautiful letter. ❤️
— Rakul Singh (@Rakulpreet) August 3, 2026
What made me say yes to Surpanakha was exactly what you mentioned - her complexity. History often remembers her for one moment, but there is so much more to her story. As an actor, roles that challenge perception are the most exciting. I… https://t.co/1wFWmfwNNd
ती पुढे म्हणाली, "एक अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या विचारांना आव्हान देणाऱ्या भूमिका साकारणे अधिक रोमांचक असते. 'रामायण' प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक शूर्पणखेच्या पात्राकडे खुल्या मनाने पाहतील, अशी मला आशा आहे."
'रामायण'मध्ये कोण साकारणार कोणती भूमिका?
या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहे. रवि दुबे लक्ष्मण, सनी देओल हनुमान, तर यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
ट्रेलरमध्ये काय दाखवण्यात आलं?
'रामायण'च्या ट्रेलरची सुरुवात रावणाच्या भव्य महालाच्या दृश्याने होते. त्यानंतर अयोध्येचा राजकुमार श्रीराम म्हणून रणबीर कपूरची झलक पाहायला मिळते. लक्ष्मणाच्या (रवि दुबे) साथीने श्रीराम राक्षसांविरुद्ध लढताना दिसतात. ट्रेलरमधील भव्य दृश्यरचना आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली असली, तरी त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित 'रामायण' दोन भागांत प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी 2026 मध्ये, तर दुसरा भाग 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






















