एक्स्प्लोर

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay CM: थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट; म्हणाली, 'प्रेम नेहमीच...'

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay Oath Chief Minister: थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री तृषा कृष्णन मिरवताना दिसली आणि जोरदार चर्चांना उधाण आलं.  

Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay Oath Chief Minister: विधानसभा निवडणुकांनंतर (Tamil Nadu Legislative Assembly Election) तामिळनाडूच्या राजकारणात (Tamil Nadu Politics) मोठा उलटफेट पाहायला मिळाला. अभिनय क्षेत्रातली कारकीर्द सोडून राजकारणाची कास धरलेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या पक्षानं पहिल्याच निवडणुकीत धमाकेदार कामगिरी करत प्रस्थापितांना जोरदार धक्का दिला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत थलपती विजय (Tamil Nadu CM Vijay) यांच्या टीव्हीके पक्षानं (TVK Party) सत्ता स्थापन केली आणि थलपती विजय मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान झाले. एकीकडे थलपती विजय यांच्या पक्षाची धुवांधार कामगिरी चर्चेचा विषय ठरली, तर दुसरीकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्याही जोरदार चर्चा रंगलेल्या. अशातच थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात अभिनेत्री तृषा कृष्णन (Actress Trisha Krishnan) मिरवताना दिसली आणि जोरदार चर्चांना उधाण आलं.  
 
एकीकडे राजकीय वर्तुळातली धुवांधार कामगिरी आणि दुसरीकडे घटस्फोटाच्या चर्चांमुळे थलपती विजय गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच मीडिया रिपोर्टनुसार, थलपती विजय यांच्या पत्नीनं त्यांचे अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध आहेत, असं घटस्फोटासाठी दाखल याचिकेत नमूद केलेलं. पत्नीनं ज्या अभिनेत्रीबाबत म्हटलंय, ती अभिनेत्री म्हणजे, तृषा कृष्णन असल्याचं बोललं जातंय. तसेच, गेल्या काही दिवसांपासून तृषा कृष्णन आणि थलपती विजय बऱ्याचदा एकत्र दिसलेत. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलंय. त्यामुळेच तृषा कृष्णनचं थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात मिरवणं, त्यांच्या आईला आणि बहिणीला मिठी मारणं सर्वांच्या नजरेत भरलं. अशातच शपथविधीसोहळ्यानंतर तृषा कृष्णन हिनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

तृषा कृष्णननं सोशल मीडियावर काय पोस्ट केली? (Trisha Krishnan Social Media Post)

तृषा कृष्णन हिनं इन्स्टाग्रामवर तिची पहिली पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये शपथविधी सोहळ्यातील तिच्या लूकचे फोटो होते. या फोटोंसोबतच, तिनं 'प्रेम' या विषयावर आधारित एक सुंदर कॅप्शन लिहिलं आणि मग काय?आधीपासूनच सुरू असलेल्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, रविवारी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर थलपती विजय यानं तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Trish (@trishakrishnan)

तृषा कृष्णन हिची पहिली पोस्ट (Trisha Krishnan First Post After Thalapathy Vijay Oath As CM)

तृषा कृष्णन हिनं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील तिच्या लूकचे काही फोटो शेअर केले. या सोहळ्यासाठी, तृषा हिनं 'सीफोम ग्रीन' रंगाची साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचा ब्लाऊज वेअर केला होता. तसेच, तिनं आपल्या केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळला होता. अभिनेत्रीच्या या पारंपरिक लूकला तिच्या चाहत्यांकडून भरभरून पसंती मिळाली. पण, सर्वांचं लक्ष वेधलं ते या फोटोंसोबत तृषा कृष्णन हिनं दिलेल्या कॅप्शननं. 

तृषा कृष्णन हिनं इन्स्टाग्राम पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं की, "प्यार हमेशा बुलंद होता है. मेरे हमेशा से साथ रहे फेवरेट लोगों का शुक्रिया..." यासोबतच तिनं तिच्या स्टायलिंग आणि मेकअप टीमचेही आभार मानले. 

शपथविधी सोहळ्यात तोऱ्यात मिरवली तृषा कृष्णन

विजय थलपती यांनी चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या समारंभादरम्यान, थलपती विजय यांचे आई-वडील, आणि त्यांच्यासोबतच तृषा कृष्णन, या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी उपस्थित होते. आपला मुलगा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर यांनी आपला आनंद व्यक्त केला, तर विजयची आई, शोभा चंद्रशेखर यांनी या विशेष दिवसाचा संबंध 'मातृदिना'शी जोडला. याशिवाय, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंमध्ये तृषा विजयच्या कुटुंबीयांना आत्मियतेनं भेटत असल्याचं दिसतंय. तृषानं विजयची आई आणि बहिणीला अगदी कडकडून मिठीसुद्धा मारल्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, विजय थलपती आणि तृषा कृष्णन ही तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या जोडीनं घिल्ली (Ghilli), थिरुपाची (Thirupaachi), आथी (Aathi), कुरुवी (Kuruvi) आणि लियो (Leo) यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलंय. बऱ्याच काळापासून, सोशल मीडिया आणि इंटरनेटवर तृषा आणि विजय यांची नावं एकमेकांशी जोडली जात आहेत. पण, या अफवांबाबत दोघांपैकी कोणीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विजय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच, एका लग्नसमारंभात ते तृषासोबत दिसून आले, आणि यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली. विजय यांची पत्नी संगीता हिनं आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tamil Nadu CM Thalapathy Vijay: तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय पहिल्याच भाषणात खोटं बोलले? वर्गमित्राच्या दाव्यानं खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget