Thech : प्रेमाच्या आयुष्याला लागलेली खूणगाठ, ‘ठेच’ चित्रपटाचा टीझर लाँच
Thech Marathi Movie : कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली 'ठेच' (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे.

Thech : ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी एक म्हण मराठीत आहे. आयुष्याचा प्रवास ठेचा खाऊनच होतो. काहीवेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली 'ठेच' (Thech) आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, 15 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे.
लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.
काय आहे कथानक?
आई वडील नसलेला शिवा मामाच्या इथे राहून आपल दहावीचं शिक्षण पूर्ण करून कॉलेजला जातो. तिथे त्याची मैत्री त्याची वर्ग मैत्रीण शामबालाशी होते. शामबालाची मैत्रीण पल्लवी ही शिवाला खूप आवडते. तो मनोमनी तिच्या सोबत आयुष्याची स्वप्नं रंगवत असतो. पण शामबाला शिवाच्या प्रेमात पडते. शामबाला शिवाला प्रपोज करण्याअगोदर शिवा शामबालाकडे पल्लावीला प्रपोज करतो. पण हट्टी शामबाला शिवाला कसं मिळवायचं हे प्लॅन करत असते. पण, शिवाने पल्लवीला मिळवण्यासाठी आणि तिच्या स्वप्नासाठी केलेला रोमांचक प्रवास ‘ठेच’ या चित्रपटात मांडण्यात आला आहे.
‘प्रेमाचा त्रिकोण’ संकल्पना
‘प्रेमाचा त्रिकोण’ ही संकल्पना अजरामर आहे. ‘ठेच’ या चित्रपटात प्रेम त्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे. कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीझरमध्ये दिसत आहे. फ्रेश लुक, लक्षवेधी संगीत आणि चित्रीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.
हेही वाचा :
- Chhupe Rustam : रंगभूमीवर नव्या नाटकाची नांदी, ‘छुपे रुस्तम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हृषिकेश-प्रियदर्शनची जोडी!
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
- Dhak Dhak Poster : कुणी बुरखा तर, कुणी परिधान केलाय पंजाबी ड्रेस! बाईकवर स्वार होऊन लडाख राईडला निघाल्या बॉलिवूडच्या स्टार्स!























