एक्स्प्लोर

नाट्यरसिकांची 10 महिन्यांची प्रतीक्षा संपली, उद्या पहिला प्रयोग सादर होणार!

रसिकांची प्रतीक्षा संपली असून नाट्यगृहांची तिसरी घंटा वाजणार आहे. सुमारे दहा महिन्यांनंतर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्य मंदिरात उद्या म्हणजेच 20 डिसेंबरला पहिला प्रयोग सादर होणार आहे. "इशारो इशारो में" हे पहिले नाटक संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल.

मुंबई : नाट्यरसिकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलात सुमारे दहा महिन्यांच्या कालावधीनंतर पहिला नाट्यप्रयोग रविवार दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी दुपारच्या सत्रात सादर होणार आहे. "इशारो इशारो में" हे पहिले नाटक संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल. प्रयोग सादरीकरणासाठी हे नाट्यगृह कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह सुसज्ज झाले आहे.

कोविड 19 या संसर्गजन्य महामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा भाग म्हणून मार्च 2020 पासून बंद ठेवण्यात आलेली नाट्यगृहे आता खुली करण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, मिशन बिगीन अगेन अर्थात पुनश्च हरिओम अंतर्गत अटी आणि शर्तींसह ही नाट्यगृहे सुरु होत आहेत.

बोरिवली येथील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलातील मुख्य व लघु नाट्यगृहांची सुविधा देखील या अटी व शर्तींसापेक्ष तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीन्वये सुरु करण्यात येत आहे. या नाट्य संकुलाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले असून सर्व तांत्रिक उपकरणांची तपासणी करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनुसार आसनक्षमता 50 टक्के राखण्यात आली आहे. प्रयोग सादरीकरणासाठी नाट्यगृह सुसज्ज आहे. येणाऱया नाट्य रसिकांचे, अभ्यागतांचे शारीरिक तापमान मोजण्यासाठी नाट्य संकुलाच्या प्रवेशद्वारांवर थर्मल स्क्रीनिंग केले जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेची नाट्यगृहे सवलतीच्या दरात नाट्य प्रयोगांसाठी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे नाट्यमंदिर संकुलातही सवलतीच्या दरात आरक्षण करुन दिनांक 20 डिसेंबर 2020 रोजी दुपार सत्रात पहिला प्रयोग सादर करण्यात येणार आहे. मार्च 2020 पासून बंद असलेली नाट्यगृहाची सुविधा जवळपास दहा महिन्यांनंतर सुरु होत आहे. नाट्यरसिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget