Apan Yana Pahilat Ka: मधुरा वेलणकर, विक्रम गायकवाड आणि तुषार दळवी यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी पार पडणार शुभारंभाचा प्रयोग
'आपण यांना पाहिलंत का?' (Apan Yana Pahilat Ka) या नाटकात मधुरा वेलणकर (Madhura welankar), विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) आणि तुषार दळवी (Tushar Dalvi ) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.
![Apan Yana Pahilat Ka: मधुरा वेलणकर, विक्रम गायकवाड आणि तुषार दळवी यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी पार पडणार शुभारंभाचा प्रयोग Madhura welankar satam new marathi natak Apan Yana Pahilat Ka with tushar dalvi and Vikram Gaikwad Apan Yana Pahilat Ka: मधुरा वेलणकर, विक्रम गायकवाड आणि तुषार दळवी यांचं 'आपण यांना पाहिलंत का?' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'या' दिवशी पार पडणार शुभारंभाचा प्रयोग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/26/84237ed3065f6ecadb8c5a6f9127c2051700996711951259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Apan Yana Pahilat Ka: नाटक बघायला अनेकांना आवडतं. विविध विषयांवर आधारित असणारी नाटकं प्रेक्षक आवडीनं बघतात. अशातच एक नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचं नाव 'आपण यांना पाहिलंत का?' (Apan Yana Pahilat Ka) असं आहे. या नाटकात मधुरा वेलणकर (Madhura welankar), विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) आणि तुषार दळवी (Tushar Dalvi ) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग कधी आणि कुठे पार पडणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...
जाणून घ्या 'आपण यांना पाहिलंत का?' च्या प्रयोगांबद्दल
नुकताच मधुरा वेलणकरनं एक खास पोस्ट शेअर करुन 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकांच्या प्रयोगांची माहिती दिली आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार 10 डिसेंबर दुपारी चार वाजता दीनानाथ नाट्यगृह, पार्ले येथे होणार आहे. तसेच 11 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरिवली येथे या नाटकाचा प्रयोग होणार आहे. तसेच 12 डिसेंबर , 16 डिसेंबर आणि 17 डिसेंबर रोजी देखील या नाटकांचे प्रयोग होणार आहेत.
'आपण यांना पाहिलंत का?' या विनोदी दोन अंकी नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच या नाटकाचं लेखन सुशील स्वामी यांनी केलं आहे. या नाटकाची निर्मिती अदिती देवेंद्र राव,वैशाली धनेश पोतदार यांन केली आहे.
View this post on Instagram
मधुरा वेलणकरनं नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, "संसार हा, "एकमेकांशिवाय आणखी काय हवं?" यातील गमती जमतींवरच टिकून असतो..अशीच एक नर्म विनोदी संसाराची गोष्ट लवकरच तुमच्या भेटीस येत आहे.." मधुरानं काही दिवसांपूर्वी आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिनं 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकाचं पोस्टर शेअर करुन लिहिलं होतं, "कोण म्हणतं, संसारात फक्त दोघंच असतात..!"
राकेश, प्रशांत, मेघा यांची गोष्ट 'आपण यांना पाहिलंत का?' या नाटकामध्ये दाखवण्यात येणार आहे. या नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलं आहे. तसेच या नाटकाला अजित परब यांनी संगीत दिलं आहे आणि नाटकाची वेशभूषा मंगल केंकर यांनी तेली आहे.
संंबंधित बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)