एक्स्प्लोर

‘द राजा साब’चा फर्स्ट रिव्ह्यू OUT! साऊथच्या सुपरहिरोसमोर संजूबाबाचा सरप्राइज swag ठरणार गेमचेंजर, क्लायमॅक्सची जबरदस्त चर्चा

विशेषतः चित्रपटाचा प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स भाग अत्यंत दमदार असल्याचे सांगण्यात येत आहे.

The Raja Saab Review: प्रभासची बहुप्रतीक्षित आगामी फिल्म ‘द राजा साब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू आता समोर आला आहे. तरुण दिग्दर्शक मारुती यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा हॉरर-एंटरटेनर 9 जानेवारी 2026 रोजी संक्रांतीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास आजवर कधीही न पाहिलेल्या हटके अंदाजात दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

मास ऑडियन्ससाठी परिपूर्ण एंटरटेनिंग 

चित्रपट समीक्षक उमैर संधू यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ‘द राजा साब’चा फर्स्ट रिव्ह्यू शेअर केला आहे. त्यांच्या मते, हा चित्रपट मास ऑडियन्ससाठी परिपूर्ण एंटरटेनर आहे. प्रभासने आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष उल्लेख करत त्यांनी संजय दत्त यांना ‘सरप्राइज पॅकेज’ म्हटलंय. प्रभास आणि संजय दत्त यांच्यातील क्लॅश सीन जबरदस्त असल्याचेही त्यांनी सांगितलेय. विशेषतः चित्रपटाचा प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स भाग अत्यंत दमदार असल्याचे त्यांनी म्हटलंय. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दिग्दर्शनालाही त्यांनी चांगली दाद दिली असून चित्रपटाला 5 पैकी 3.5 स्टार दिले आहेत.


‘द राजा साब’चा फर्स्ट रिव्ह्यू OUT! साऊथच्या सुपरहिरोसमोर संजूबाबाचा सरप्राइज swag ठरणार गेमचेंजर, क्लायमॅक्सची जबरदस्त चर्चा

सेन्सॉर बोर्डाचा ग्रीन सिग्नल

दरम्यान, ‘द राजा साब’ने सेन्सॉर बोर्डाच्या सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. वृत्तांनुसार, केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळाने चित्रपट पाहून समाधान व्यक्त केले असून त्याला यूए (16+) प्रमाणपत्र दिले आहे. काही दृश्ये आणि संवादांमध्ये किरकोळ बदल सुचवण्यात आले होते, जे निर्मात्यांनी तात्काळ लागू केल्यानंतर चित्रपटाला मंजुरी देण्यात आली.

भव्य सेट्स, प्रभावी VFX

सुमारे 3 तास 10 मिनिटे म्हणजे सुमारे 190 मिनिटे लांबीचा हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवेल, असा विश्वास निर्मात्यांचा आहे. प्री-क्लायमॅक्स आणि क्लायमॅक्स मिळून जवळपास 45 मिनिटांचा दमदार शेवटचा भाग चित्रपटाची खासियत ठरणार आहे. भव्य सेट्स आणि प्रभावी VFX मुळे चित्रपटाला ग्रँड आणि रहस्यमय वातावरण मिळाले आहे.

काय आहे कथानक?

कथानक राजासाब या पात्राभोवती फिरते, ज्याची भूमिका प्रभासने साकारली आहे. राजघराण्यात जन्मलेला राजासाब आर्थिक अडचणींमुळे साधं आयुष्य जगतो. तो आपल्या आजी गंगादेवी (गंगाव्वा) यांच्यासोबत राहतो. खानदानी, रहस्यमय महालात प्रवेश केल्यानंतर सुरू होणाऱ्या घटनांभोवती कथा गुंफली आहे. हरवलेली मालमत्ता, आजोबांचा विश्वास आणि कुटुंबातील भावनिक नातेसंबंध हे चित्रपटाचे महत्त्वाचे पैलू आहेत.चित्रपटात मालविका मोहनन, निधी अग्रवाल, रिद्धी कुमार, बोमन ईरानी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून ‘द राजा साब’ प्रभासच्या करिअरमधील एक वेगळा आणि धाडसी प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget