The Prayer Short Film : विश्वास की परिस्थिती? 14 मिनिटं 49 सेकंदांची मानवी मनाची अवस्था उलगडणारी 'द प्रेयर'
The Prayer Short Film : 'द प्रेयर' ही एका हृदयस्पर्शी प्रसंगावर आधारित कथा आहे. प्रार्थना केल्याने गोष्टी सुरळीत होतात का? की परिस्थिती हे सगळे घडवून आणते? हा विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून 'द प्रेयर'मधील संवेदनशील कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही शॉर्टफिल्म नक्कीच प्रेक्षकांना भावेल.

The Prayer Short Film : प्रार्थना हा आत्म्याचा आवाज असतो. जेव्हा प्रार्थना पूर्णत्वास येते तेव्हा तो विश्वास असतो की ती परिस्थिती असते? हे प्रत्येक जण आपापले ठरवतो. अशाच संकल्पनेवर आधारित 'द प्रेयर' (The Prayer) ही हिंदी शॉर्टफिल्म (Hindi Short Film) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मॅक वर्ल्ड फिल्म्स प्रस्तुत या शॉर्टफिल्मचे निर्माते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) असून ते प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहेत. निवेदिता पोहनकर लिखित, दिग्दर्शित या शॉर्टफिल्ममध्ये अदिती पोहनकर, मकरंद देशपांडे, स्मिता जयकर, संदीप धाबाळे, सुशांत जाधव, सोहिनी नियोगी, साहिल खान, श्रुती श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 14 मिनिटांची ही शॉर्टफिल्म हिंदी आणि इंग्रजी मध्ये प्रदर्शित होणार आहे.
'द प्रेयर' ही एका हृदयस्पर्शी प्रसंगावर आधारित कथा आहे. प्रार्थना केल्याने गोष्टी सुरळीत होतात का? की परिस्थिती हे सगळे घडवून आणते? हा विचार करायला लावणारी ही शॉर्टफिल्म असून 'द प्रेयर'मधील संवेदनशील कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाने ही शॉर्टफिल्म नक्कीच प्रेक्षकांना भावेल. अमित रॉय या शॉर्टफिल्मचे डिओपी असून दीपा भाटिया आयुष सपरा यांनी संकलन केले आहे. या सगळ्याला पूरक ठरणारे टबी यांचे भावनिकदृष्ट्या प्रभावी संगीत या शॉर्टफिल्मचा प्रभाव अधिकच गडद करते.
View this post on Instagram
निवेदिता पोहनकर म्हणतात, 'विश्वास ही एक अशी स्थिती आहे. जी असते किंवा नसते. 'द प्रेयर' ही मानवी मनाच्या या दोन अवस्था उलगडण्याचा प्रयत्न करणारी शॉर्टफिल्म आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडते, तेव्हा मन भांबावून जाते, पळ काढते. परंतु ज्या क्षणी मन शांत होते, त्या क्षणी अंतःकरणाचा स्पष्ट, अढळ आवाज आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि उचित कृतीसाठी मार्गदर्शन करतो. प्रार्थनेवर केवळ विश्वास असणे गरजेचे आहे. हेच आम्ही या 14 मिनिटे 49 सेकंदातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.''
निर्माते मकरंद देशपांडे म्हणतात, " मी प्रथमच शॉर्टफिल्मची निर्मिती करत आहे आणि पहिल्याच वेळी एक उत्तम आणि सखोल आशय असलेल्या कथेचा भाग होणे, हे नक्कीच सुखावह आहे. टीम अप्रतिम आहे. मी निवेदिता पोहनकरचे विशेष कौतुक करेन, तिने एक संवेदनशील, नाजूक विषय अतिशय प्रगल्भतेने हाताळला आहे. ही शॉर्टफिल्म प्रेक्षकांना एक नवीन अनुभव देईल, याची आम्हाला खात्री आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























