एक्स्प्लोर

'द केरळ स्टोरी 2' च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, लिपलॉक सीनसह संवादही बदलले, 7-8 नव्हे तब्बल 16 मोठे बदल

अशा प्रकारच्या चित्रपटांना सहसा प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र मिळते; मात्र केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने प्रमाणपत्र देत मंजुरी दिली आहे.

The Kerala Story 2: गेल्या काही दिवसांपासून ‘द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ या बहुचर्चित चित्रपटाभोवती मोठा वाद सुरू असून सोशल मीडियावरही याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. धक्कादायक आणि वादग्रस्त विषयामुळे आधीच चर्चेत असलेला हा चित्रपट येत्या शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांना सहसा प्रौढांसाठीचे प्रमाणपत्र मिळते; मात्र केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने  या चित्रपटाला यू/ए 16+ प्रमाणपत्र देत मंजुरी दिली आहे. मात्र, त्याआधी सेन्सॉर मंडळाने चित्रपटात तब्बल 16 बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. (The Kerala Story 2)

‘द केरला स्टोरी 2 मधील 16 कट

-मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएफसीने काही दृश्ये आणि संवाद छाटण्यास सांगितले आहे. किसिंग सीन 50 टक्क्यांनी कमी करण्यात आला असून लिप-लॉक सीन सुमारे 7 सेकंदांनी छोटा करण्यात आला आहे. तसेच बलात्काराच्या दृश्यातील दृश्यफीतही 50 टक्क्यांनी कमी करून सुमारे 20 सेकंदांनी कापण्यात आली आहे.

-याशिवाय एका महिलेला चापट मारण्याचा आणि दुसऱ्या दृश्यात महिलेच्या डोक्याला मार लागण्याचा भाग प्रत्येकी 2 सेकंदांनी कमी करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवतानाचे दृश्य बदलण्यासही सांगितले आहे.

-तिन्ही ठिकाणी संवाद बदलण्यात आले असून एका शब्दाला म्यूट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचा डिस्क्लेमर जोडण्यास सांगितले आहे. स्थिर मजकुराचा कालावधी 2 मिनिटे 3 सेकंदांनी वाढवण्यासह ध्वनिमुद्रित निवेदन जोडण्याचे निर्देश देण्यात आले.

-मेकर्सना पटकथेनुसार संवादांची प्रत आणि चित्रपटातील सत्य घटनांसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच एका बालकलाकाराच्या निवडीसाठी संमतीपत्रही सीबीएफसीकडे जमा करण्यात आले आहे.

चित्रपटाचा कालावधी किती?

हे सर्व बदल पूर्ण झाल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमाणपत्रानुसार चित्रपटाची एकूण लांबी 131.24 मिनिटे म्हणजेच 2 तास 11 मिनिटे 24 सेकंद इतकी आहे.

कधी प्रदर्शित होणार?

‘द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड’ या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली असून दिग्दर्शन कामाक्ष्या नारायण सिंह यांचे आहे. चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget