एक्स्प्लोर

Lata Mangeshkar: "सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे; आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ"; श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांची घोषणा

सरकारने लता मंगेशकर यांच्या नावचे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय सांगलीत उभारावे.त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय.

Lata Mangeshkar: गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय.  मात्र लतादीदी सांगलीच्या असल्याने त्यांच्या नावाचे सांगलीत आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभे करावे. त्यासाठी आवश्यक ती जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन (Vijay Singh Patwardhan) यांनी एबीपी माझाशी बोलताना केलीय.

सांगली गणपती पंचायतन  संस्थांनच्या  दरबार हॉल मध्ये श्री च्या मूर्तीची स्थापना आज करण्यात आली. यावेळी विजयसिंहराजे पटवर्धन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  जगभरात लतादीदींचे नाव आहे. त्यांच्या बालपण सांगलीत गेले. मंगेशकर कुटुंबीयांची नाळ या सांगली शहराशी जोडली गेली आहे. त्यामुळे सांगलीला त्यांच्या नावे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करावे. ज्यात केवळ संगीत शिक्षणच नव्हे तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश करावा. असे विद्यापीठ झाल्यास सांगलीचे नाव या कारणासाठी पुन्हा जगाच्या नकाशावर कोरले जाईल. विद्यापीठासाठी जागेची आवश्यक आम्ही पूर्ण करू. पंचायतन अशा उपक्रमांसाठी जागा द्यायला तयार आहेत. या विद्यापीठात गोरगरीब विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे शिक्षणही मिळावे, अशी  अपेक्षाही विजयसिंह राजे पटवर्धन यांनी यावेळी बोलून दाखवलीय.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पससमोर उच्च व तंत्र शिक्षण विभागाची जागा आहे. याच जागेत भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उभारण्यात येणार आहे, असं म्हटलं जात आहे. या कामासाठी एका खास समितीची स्थापना करण्यात आली होती. लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात सुरू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतीय बासरी वादन, तबला वादन, सतार वादन, हार्मोनियम/कीबोर्ड वादन, ध्वनी अभियांत्रिकी अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 93 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लता दीदींच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. त्यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली.

मेरी आवाज ही पहचान है,मेरे ख्वाबों में जो आए, लग जा गले,अजीब दास्तां है ये,सत्यम शिवम सुन्दरम, पिया तोसे नैना लागे रे यांसारखी सुपरहिट गाणी लता मंगेशकर  यांनी गायली आहेत.  लता मंगेशकर यांनी  त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar : लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीच्या डिझाईनसाठी स्पर्धा भरवणार; विजेत्याला मिळणार दोन लाखांचं बक्षीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget