2010 मध्ये सिनेमात आईच्या भूमिका साकारल्या,आता पर्सनॅलिटीमध्ये मोठं टान्सफॉर्मेशन पाहून अवाक व्हाल!
Telugu Actress Pragathi : 2010 मध्ये सिनेमात आईच्या भूमिका साकारल्या,आता पर्सनॅलिटीमध्ये मोठं टान्सफॉर्मेशन पाहून अवाक व्हाल!

Telugu Actress Pragathi : टॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री प्रगतीने (Telugu Actress Pragathi) साकारलेल्या भूमिका कोणीही विसरणार नाही. दशकभरापूर्वी तिने साकारलेल्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घरं करुन आहेत. मात्र, हिच अभिनेत्री प्रगती (Telugu Actress Pragathi) सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. 2010 मध्ये साऊथ सिनेमांमध्ये हिरोच्या आईच्या भूमिका साकारणारी प्रगती आता खूप बदललेली आहे. कारण तिने पर्नसॅनिलिटीमध्ये मोठं ट्रान्सफॉर्मेशन केलंय.
View this post on Instagram
प्रगती (Telugu Actress Pragathi) सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यामुळे आजच्या नायिकांना हेवा वाटू लागला आहे. तिचे लेटेस्ट फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. 17 एप्रिल 1975 रोजी जन्मलेल्या प्रगतीने बालपणीच तिच्या वडिलांना गमावले. आईला मदत करण्यासाठी ती कार्टून पात्रांना आवाज देत असे. कॉलेजच्या पहिल्या वर्षात, ती चेन्नईतील म्हैसूर सिल्क पॅलेसच्या जाहिरातींमध्ये झळकली होती. ही जाहिरात पाहून तमिळ दिग्दर्शक के. भाग्यराजने तिला 'वीताल विषेशंगल' या चित्रपटात नायिका म्हणून काम करण्याची संधी दिली.
सिनेसृष्टीत प्रवेश केल्यानंतर, प्रगतीने तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले. बहुतेकदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसले. 'एमेंडी एवेला' या तेलुगू चित्रपटात नायकाच्या आईची भूमिका साकारल्याबद्दल तिला नंदी पुरस्कार मिळाला. चित्रपटांमध्ये अनेक पात्र कलाकार असतात, पण प्रगतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. तसेच अनेक मालिकांमध्ये काम केले. तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना लग्न झाले. मात्र, वैवाहिक जीवनात काही समस्या होत्या. तिने तिच्या पतीला घटस्फोट दिला आणि ती तिच्या मुलीसोबत एकटीच राहू लागली.
प्रगतीने एका मुलाखतीत सांगितले की, करिअर चांगलं असताना लग्न करणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. या एका निर्णयाने मला 10-20 वर्षे मागे नेले. अलिकडेच प्रगतीच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आली होती, ज्यावर तिने मोकळेपणाने भाष्य केलं होतं. ती म्हणाली की, लग्न आणि जोडीदार हे प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. परंतु त्यांच्या परिपक्वतेच्या पातळीनुसार योग्य व्यक्ती शोधणे कठीण असते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























