Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Marathi Serial Update : तो क्षण लवकरच येणार! नेत्रा करणार अस्तिकाचा शेवट, मालिकेला रंजक वळण


 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. तसेच लवकरच या मालिकेत मोठी ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. कारण लवकरच त्रिनयना देवी अस्तिकाचा शेवट करणार आहे. अस्तिका विरोचकाने दिलेला काळा मणी तिच्याकडे असल्यामुळे सुरक्षित रहात होती. पण ही गोष्ट नेत्राला कळते आणि ती हीच गोष्ट अद्वैतला सांगते. त्याचवेळी रुपालीसुद्धा अस्तिकाला सांगते की अव्दैत-नेत्रा दोघे मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Nitish Bharadwaj :  महाभारतामधील 'कृष्ण' तिसऱ्यांदा लग्न करणार? नितीश भारद्वाज यांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले 'माझा अजूनही लग्नसंस्थेवर...'


 महाभारतामध्ये (Mahabharat) अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यामुळे नितीश भारद्वाज यांना विशेष प्रसिद्धी देखील मिळाली. पण मागील काही दिवसांपासून नितीश भारद्वाज हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेच चर्चेत आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांचा दुसरा संसार देखील मोडला. भारद्वाज यांनी आपली पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे विरोधात पोलिसांत धाव घेतली. त्याचप्रमाणे आपल्या मुलींचेही अपहरण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Pushpa 2 The Rule Rashmika Mandanna First Look : गळ्यात डोरलं, बोरमाळ, कपाळावर कुंक अन् भेदक नजर; पुप्षा 2 मधील लक्ष वेधणारा 'श्रीवल्ली'चा लूक


  बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केल्यानंतर  पुष्पाचा सिक्वेल 'पुष्पा-2' (Pushpa 2 The Rule) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या पुष्पा या व्यक्तिरेखेसोबत रश्मिकाने साकारलेल्या श्रीवल्ली ही व्यक्तीरेखाही प्रेक्षकांना भावली होती. चित्रपटातील 'श्रीवल्ली' या गाण्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता रश्मिका मंदानाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  'पुष्पा -2' निर्मात्यांनी श्रीवल्लीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Prashant Damle Birthday : 40 वर्षांच्या कारकिर्दीत कोणतीच कॉन्ट्रोव्हर्सी का नाही? प्रशांत दामलेंनी दिलं भन्नाट उत्तर; म्हणाले 'त्यासाठी वेळ द्यावा...'


मराठी नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांच्या यादीतलं प्रशांत दामले (Prashant Damle) हे एक नाव आहे. मराठी रंगभूमीसह मालिकाविश्व, सिनेसृष्टीतही प्रशांत दामले यांचा वावर आजही कायम आहे आणि तो प्रेक्षकांच्याही तितकाच पसंतीस पडते. गेली 40 वर्ष रंगभूमीची सेवा करणाऱ्या या अवलियाचा आज 63 वा वाढदिवस आहे. प्रशांत दामले यांनी 'टूरटूर' नाटकापासून त्यांचा 'बेस्ट प्रवास' सुरु केला जो आजही सुरुच आहे. त्यांच्या या 40 वर्षांच्या कारकिर्दीची यादी तशी बरीच मोठी आहे. पण या 40 वर्षांमध्ये प्रशांत दामले यांच्यावरील एकही वाद किंवा कोणत्याही चर्चा कधीच ऐकायला मिळाल्या नाहीत हे विशेष. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Ramayana : 'रामायण'च्या स्टारकास्टचा सेटवरून लूक व्हायरल; राजा दशरथच्या भूमिकेत अरुण गोविल, लारा दत्ता कोणत्या भूमिकेत?


 चित्रपट दिग्दर्शक नितेश तिवारीचा ड्रीम प्रोजेक्ट 'रामायण'चे (Ramayan Movie) चित्रीकरण सुरू झाले आहे. रामायण चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत पार पडत असून आता सेटवरून फोटो व्हायरल होऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटचा फोटो, व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता चित्रपटातील कलाकारांचा लूक व्हायरल झाला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Marathi Actors in Politics : लोकसभेच्या वातावरणात मराठी कलाकार राजकारणातील एन्ट्रीचा मुहूर्त साधणार? उत्तर-पश्चिम जागेसाठी शिंदे गटाकडून 'या' अभिनेत्यांची चाचपणी सुरु


लोकसभा निवडणुका 2024 (Lok Sabha Election 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाची लगबग सध्या सुरु आहे. आपला तगडा उमेदवार मतदारसंघात पाठवण्यासाठी प्रत्येक पक्षाची जोमाने चाचपणी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.  अनेक मोठे नेते लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे. यामध्ये कलाकार मंडळीही कुठे मागे राहिले नसल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता शिंदे गटाकडून (Shinde Group) मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North-West Lok Sabha Constituency) मतदारसंघासाठी काही अभिनेत्यांची चाचपणी सुरु असल्याचं समोर आलं आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Akshay Kumar : दारु प्यायल्यानंतर अक्षय कुमार काय करतो? सलमान खानच्या कार्यक्रमात केला खुलासा, म्हणाला 'मी माझ्या लायकीवर...'


बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचं (Akshay Kumar) नाव घेतलं जातं. तो त्याच्या फिटनेस आणि हेल्थच्या बाबतीत कायमच गंभीर असतो. त्यासाठी तो दारु काय चहा सुद्धा पित नाही. पण एकदा अक्षयने खुलासा केला होता की, वाईन प्यायल्यानंतरही त्याला नशा चढते. तेव्हा तो काय करतो याबाबत एक मजेदार किस्सा देखील त्याने या कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा