Akshay Kumar : बॉलीवूडच्या सुपरस्टार्समध्ये खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचं (Akshay Kumar) नाव घेतलं जातं. तो त्याच्या फिटनेस आणि हेल्थच्या बाबतीत कायमच गंभीर असतो. त्यासाठी तो दारु काय चहा सुद्धा पित नाही. पण एकदा अक्षयने खुलासा केला होता की, वाईन प्यायल्यानंतरही त्याला नशा चढते. तेव्हा तो काय करतो याबाबत एक मजेदार किस्सा देखील त्याने या कार्यक्रमादरम्यान सांगितला आहे. 


अक्षयने सलमान खानच्या दस का दम या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने याबाबत मजेशीर खुलासा केला आहे. यावेळी त्याने सांगितलं की, जेव्हा मला वाईन चढते तेव्हा मी जेवण बनवायला लागतो. अक्षयचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.               






अक्षय कुमारने केला मजेशीर खुलासा


यामध्ये अक्षय कुमारने सांगितलं आहे की, त्याला थोडी वाईन जरी प्यायली तरी त्याची नशा चढते. पण त्याला नशा चढल्यावर तो गात किंवा नाचत नाही, तर जेवण बनवून त्याच्या बायकोला ट्विंकल खन्नाला भरवतो. अक्षयच्या या उत्तरावर कार्यक्रमात एकच हशा पिकला. 


नशेत जेवण बनवतो आणि माझ्या लायकीवर येतो - अक्षय कुमार


यावर बोलताना अक्षय कुमारनं म्हटलं की, मी थोडी जरी वाईन पिली तर ती मला चढते. नशेत लोकं खूप काही करतात. काही गातात, काही पडतात रागावतात पण मी जेवण बनवायला सुरुवात करतो. तेव्हा मी माझ्या लायकीवर येतो. 


अॅक्टर बनवण्याआधी अक्षय होता शेफ


खरतर अक्षय अॅक्टर बननण्याआधी शेफ होता. तो कॅनडामध्ये शेफ म्हणून काम देखील करत होता. अक्षयने सांगितलं की, मी फक्त कुकिंगच नाही करत तर ते मी बायकोला देखील भरवतो. 






ही बातमी वाचा : 


Sai Tamhankar on Politics :  'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज', निवडणुकांआधी सई ताम्हणकरच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष