Nitish Bharadwaj :  महाभारतामध्ये (Mahabharat) अभिनेते नितीश भारद्वाज (Nitish Bharadwaj) यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. त्यामुळे नितीश भारद्वाज यांना विशेष प्रसिद्धी देखील मिळाली. पण मागील काही दिवसांपासून नितीश भारद्वाज हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बरेच चर्चेत आहेत. तब्बल दहा वर्षांनी त्यांचा दुसरा संसार देखील मोडला. भारद्वाज यांनी आपली पत्नी आयएएस अधिकारी स्मिता घाटे विरोधात पोलिसांत धाव घेतली. त्याचप्रमाणे आपल्या मुलींचेही अपहरण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 


नितीश यांचा पहिला विवाह 1991 मध्ये मोनिशा पाटिल सोबत झाला. जवळपास 15 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  2009 मध्ये नितीश यांनी आयएएस अधिकारी स्मिता यांच्यासोबत विवाह केला. मात्र, त्यांचा हा संसार 10 वर्षच टिकला. मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला. वर्ष 2022  मध्ये दोघे वेगळे झाले. याच परिस्थितीमध्ये नितीश भारद्वाज यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एक नवी चर्चा रंगली आहे. नितीश भारद्वाज हे तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. 


नितीश भारद्वाज यांनी काय म्हटलं?


नितीश भारद्वाज यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करणार का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना नितीश भारद्वाज यांनी म्हटलं की,'या लग्नामुळे मला खूप दु:ख झालंय. माझ्या दोन्ही मुली माझ्यापासून दूर गेल्यात. त्यांना मला बाबा म्हणायाचीही लाज वाटते. पण या सगळ्यात माझी फसवणूक झाली आहे. मी आजही माझ्या मुलींसाठी न्यायालयात लढतोय. त्यामुळे आता मी इतर महिलांबरोबर कसं वागेन हे मला आता सांगता येणार नाही. पण अजुनही माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. आतापर्यंत मी अनेक लग्न यशस्वी होताना पाहिली आहेत.' 


13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत - नितीश भारद्वाज


नितीश भारद्वाज यांनी IAS पत्नी स्मिता घाटेविरोधात न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान नितीश आणि स्मिताचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू आहे. नुकतचं टाइम्स नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत नितीश भारद्वाज यांनी आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. मी फक्त नावाचा पती आहे. गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक त्रास होत आहे. माझ्या पत्नीला माझी गरज नाही. गेल्या 13 वर्षांपासून तिने शारीरिक संबंध ठेऊ दिले नाहीत, असं नितीश भारद्वाज म्हणाले आहेत. 






ही बातमी वाचा : 


Nitish Bharadwaj : छोट्या पडद्यावरील श्रीकृष्णाच्या घरी 'महाभारत'; IAS पत्नीविरोधात पोलिसांत धाव, मुलींचे अपहरण केल्याची तक्रार