Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...


Daniel Balaji Death :  दाक्षिणात्य अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला (South Industry) सुप्रसिद्ध कलाकार डॅनियल बालाजीचे (Daniel Balaji) वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा सध्या पसरली आहे. नुकतेच दक्षिणेतील लोकप्रिय कॉमेडियन लक्ष्मीनारायण शेषू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.चित्रपटसृष्टी अजून या धक्क्यातून सावरली नव्हती की आता डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला आहे. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


'देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण


अनेक गोष्टींचं गुढ असलेली सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nnaware) यांची मुख्य भूमिका या मालिकेत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर, राहुल मेहंदळे, सुरुची अडारकर यांसारखी मंडळी देखील या मालिकेत पाहायला मिळतात. नुकतच या मालिकेने 500 भागांचा टप्पा पूर्ण केलाय. त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन देखील करण्यात आलं. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


UBT Star Campaigners List : किरण माने, बांदेकर भोवजी ठाकरेंची मशाल घराघरात पोहचवणार, चांद्यापासून बांद्यापर्यंत स्टार प्रचारक प्रचार करणार


सध्या देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election 2024) जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी देखील जाहीर केली जातेय. नुकतीच शिवसेना ठाकरे गटाकडून (Shivsena Thackeray Group) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अभिनेते किरण माने (Kiran Mane) आणि आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आदेश बांदेकर हे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आहेत. त्याचप्रमाणे किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यामुळे आता हे स्टार प्रचारक ठाकरेंची मशाल घरोघरी पोहचवणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Hardik Pandya : 'आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायलाच हवा', हार्दीक पांड्यासाठी बॉलीवूड अभिनेत्याची खास पोस्ट चर्चेत


 अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा त्याच्या अभिनयानमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सामाजिक कार्यामुळेही तो कायमच फ्रंटवर असतो. कोविड काळात त्याने केलेल्या कामाचं विशेष कौतुक झालं. पण हा अभिनेता सध्या एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरु झाला आहे. पण या हंगमात मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दीक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांमध्ये बरीच नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच वादावर सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Bollywood Actor : करण जोहरच्या फ्लॅटमध्ये गर्लफ्रेंडसोबत भाड्याने राहणार आमिर खानचा भाचा, महिन्याचं घरभाडं ऐकून व्हाल थक्क


 आमिर खानचा (Amir Khan) पुतण्या आणि अभिनेता इम्रान खान (Imran Khan) त्याची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनसोबत वांद्रे (Bandra) येथे शिफ्ट होत आहे. त्याने करण जोहरचा (Karan Johar) फ्लॅट भाड्याने घेतला आहे. त्याच्या या इमारचीच्या आसपास अनेक सेलिब्रेटी राहतात. तसेच इम्रान खानचा मामा म्हणजेच आमिर खानही त्याच्या जवळच राहतो. पण या घराच्या भाड्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या घराचं महिन्याचं भाड एकूनच तुम्ही थक्क व्हाल. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 


Kangana Ranaut on Rahul Gandhi : मंडीत कंगनाच्या प्रचारात जय श्रीरामच्या घोषणा, भाषणादरम्यान राहुल गांधींवर गंभीर आरोप, म्हणाली 'त्यांना हिंदूंची शक्ती...'


 भाजपकडून (BJP) बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेचं तिकीट (Lok Sabha Election 2024) देण्यात आलं. त्यानंतर आता कंगनाने आता तिच्या प्रचाराला सुरुवात केलीये. कंगनाला हिमचाल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मंडी ही कंगनाची जन्मभूमी आहे. त्यामुळे यावेळी तिनं लोकांना म्हटलं की, असा विचार करु नका की कंगना एक अभिनेत्री आहे, कंगना ही तुमची मुलगी आहे. तसेच यावेळी तिने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवरही (Congress) गंभीर आरोप केलेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा