Kangana Ranaut on Rahul Gandhi : भाजपकडून (BJP) बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिला लोकसभेचं तिकीट (Lok Sabha Election 2024) देण्यात आलं. त्यानंतर आता कंगनाने आता तिच्या प्रचाराला सुरुवात केलीये. कंगनाला हिमचाल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. मंडी ही कंगनाची जन्मभूमी आहे. त्यामुळे यावेळी तिनं लोकांना म्हटलं की, असा विचार करु नका की कंगना एक अभिनेत्री आहे, कंगना ही तुमची मुलगी आहे. तसेच यावेळी तिने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसवरही (Congress) गंभीर आरोप केलेत. 


कंगनाने काय म्हटलं?


मंडीत कंगनाने रोड शॉ देखील केला. यावेळी तिनं लोकांना संबोधित करताना म्हटलं की, 'जर मी इथे निवडून आले तर तुमच्या सेवेत मी कोणतीही कमरता भासू देणार नाही. तुम्ही हा विचार करु नका की कंगना एक अभिनेत्री आहे, हा विचार करु नका की कंगना एक स्टार आहे, हा विचार करा की कंगना आपली मुलगी आहे, आपली बहिण आहे. इथला प्रत्येकजण माझा नातेवाईक आहात.' तसेच यावेळी मोदींच्या समर्थनार्थ आणि जय श्रीराम या घोषणा देखील देण्यात आल्यात. 






कंगनाचे राहुल गांधींवर गंभीर आरोप


कंगनाने यावेळी तिच्या भाषणादरम्यान राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. यावर तिनं म्हटलं की, 'आपल्याच घरातून उमेदवारी मिळणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. पण काँग्रेसला ही आनंदाची गोष्ट बघवली नाही जात. त्यांनी त्यांच्या घाणरेड्या राजकारणाला सुरुवात केली.' 'त्यांच्या मुख्य नेतृत्व राहुल गांधी यांनी म्हटलं की, हिंदूमध्ये जी शक्ती आहे ती मला नष्ट करायचीये', असं म्हणत कंगनाने राहुल गांधींवर निशणा साधला. पुढे कंगनाने म्हटलं की, 'काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत, ते म्हणतात मंडीच्या ज्या मुली आहेत, त्यांचे भाव काय सुरु आहेत. अशा प्रकारची नीच आणि अभद्र गोष्टी एकून कोणाचं हृदय नाही पिळवटणार', असं म्हणत कंगनाचे काँग्रेसवर गंभीर आरोप केलेत. 






ही बातमी वाचा : 


सरदार पटेलांबाबत जावईशोध लावणाऱ्या कंगना रणौतला विश्वास पाटलांनी सुनावलं, म्हणाले...