Sonu Sood Post for Hardik Pandya : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा त्याच्या अभिनयानमुळे कायमच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या सामाजिक कार्यामुळेही तो कायमच फ्रंटवर असतो. कोविड काळात त्याने केलेल्या कामाचं विशेष कौतुक झालं. पण हा अभिनेता सध्या एका वेगळा कारणामुळे चर्चेत आला आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरु झाला आहे. पण या हंगमात मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद हार्दीक पांड्याकडे (Hardik Pandya) देण्यात आलं आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांमध्ये बरीच नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय. त्याच वादावर सोनू सूद याने प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएलच्या हंगामात मुंबईने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. मुंबईचा पहिला समाना हा हार्दीक पांड्याने आधी ज्या संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारली होती, त्या गुजरात सोबत झाला आणि दुसरा हैदराबादसोबत. पण या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्कारावा लागला आहे. त्यामुळे हार्दीक पांड्याच्या कर्णधार पदावर बरीच नाराजी व्यक्त केली जातेय. सोशल मीडियावरही हार्दीकला बरंच ट्रोल देखील करत असल्याचं पाहायला मिळतंय. याच सगळ्यावर सोनू सूदने भाष्य केलं आहे.
सोनू सूदने नेमकं काय म्हटलं?
सोनूने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत यावर सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायलाच हवा. हेच खेळाडू आपल्याला, आपल्या देशाला कायमच अभिमान वाटावा असं करतात. एक दिवस तुम्ही त्यांना चिअर करत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्यांना नावं ठेवता. त्यामुळे ते कुठेही फेल होत नाहीत, तर यामध्ये आपण फेल होतो. मला क्रिकेट खूप आवडतं. जो माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो तो प्रत्येक खेळाडू मला खूप आवडतो. त्यामुळे तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. त्याचप्रमाणे तो संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे की तो संघातला 15 वा खेळाडू म्हणून खेळत आहे, यानेही फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत.
सोनू सूदच्या कामाविषयी
सोनू सूदचा फेतह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनू मुख्य भूमिकेत असून त्याने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. तसेच त्याचा पृथ्वीराज हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या शहीद या चित्रपटामधून सोनूनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटांबरोबरच तो जाहिरातींमध्ये देखील काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे.